PMC Election : पुण्यात मोठा भाऊ कोण? ठाकरे-मनसेच्या जागेचं गणित ठरलं! वसंत तात्या म्हणाले 'राज ठाकरेंना स्वत: मी...'

Last Updated:

Vasant More On PMC Election seats: पुण्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून 70 टक्के जागा महापालिकेच्या लढण्यासाठी आग्रही असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

Vasant More On PMC Election
Vasant More On PMC Election
Vasant More On PMC Election : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती झाली आहे. अशातच पुण्यात मोठा भाऊ कोण? अशी चर्चा सुरू असताना आता ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जागा वाटपाची चर्चा मुंबईत सुरू असताना वसंत मोरे यांनी शिवसेना उबाठा मोठा भाऊ असल्याचं म्हटलं आहे. तसेच निवडणुकीच्या तयारीवर त्यांनी सकारात्मक विश्वास व्यक्त केलाय.

काय म्हणाले वसंत मोरे?

मनसे आणि शिवसेनेचा निर्णय मराठी माणसांसाठी महत्त्वाचा आहे. 2017 मध्ये शिवसेनेने जवळजवळ 130 -135 जागेवर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे मला वाटतं की 70 टक्के जागा या शिवसेनेकडे असतील, असं वसंत मोरे म्हणाले आहेत. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसोबत मी काम केलं आहे. त्यामुळे मला दोन्ही पक्षाचा अनुभव आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांसोबत काम करू. पण मोठा भाऊ म्हणून शिवसेनेने 70 टक्के जागा लढवल्या पाहिजेत, अशी मागणी आम्ही केली आहे.
advertisement

मोठा भाऊ म्हणून 70 टक्के जागा

प्रचाराच्या माध्यमातून राज ठाकरेंना सुद्धा भेटेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते वसंत मोरे यांनी दिली आहे अनेक वर्ष मनसेत काम केल्यानंतर वसंत मोरे शिवसेनेत काम करत आहेत त्यानंतर आता दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याने पुन्हा एकदा वसंत मोरे यांना राज ठाकरे सोबत काम करावे लागणार आहे. तर पुण्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून 70 टक्के जागा महापालिकेच्या लढण्यासाठी आग्रही असल्याचे म्हटले आहे.
advertisement

दोन्ही पक्षाची पुण्यात मोठी ताकद

तसे दोन प्रस्ताव एकमेकांना देण्यात आले आहेत आणि चांगला परिणाम पुण्यात होईल, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. दोन्ही पक्षाची पुण्यात मोठी ताकद आहे 2017 ला मोठ्या संख्येने मतदान मनसे आणि शिवसेनेने घेतला आहे त्यामुळे त्याचा आम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे आमच्या दोन पक्षांची दखल इतर पक्षांना घ्यावा लागणार आहे.
advertisement

मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी

दरम्यान, मुंबईमध्ये ज्या प्रकारे मनसेच्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी मशाल चिन्ह दिला आहे. तसेच पुण्यातही एकच चिन्ह राहिले आणि मशाल चिन्ह आणि सर्वांनी निवडणूक लढवली तर चांगला निकाल येऊ शकतो, असा विश्वास देखील वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
PMC Election : पुण्यात मोठा भाऊ कोण? ठाकरे-मनसेच्या जागेचं गणित ठरलं! वसंत तात्या म्हणाले 'राज ठाकरेंना स्वत: मी...'
Next Article
advertisement
BMC Election: मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! मुंबई महापालिका निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण काय?
मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का
  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

View All
advertisement