advertisement

Rain Alert : पुढील तीन दिवस महत्त्वाचे, राज्यामध्ये पावसाचं धुमशान, या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट

Last Updated:

पुढील तीन दिवस राज्यामध्ये पावसाचे धुमशान असेच पाहायला मिळणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना 13 मे रोजीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.

+
News18

News18

पुणे : मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये प्रचंड उष्णता सहन केल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यामध्ये पावसाचे चांगलेच आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी म्हणजे आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी देखील बरसल्या.
पुढील तीन दिवस राज्यामध्ये पावसाचे धुमशान असेच पाहायला मिळणार आहेराज्यातील अनेक जिल्ह्यांना 13 मे रोजीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यावर पावसाचे सावट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पाहुयात 13 मे रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर कोकण विभागातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा इशारा दिला आहेपश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सातारासांगलीकोल्हापूर आणि सातारा या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहेया सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो.
advertisement
मराठवाड्यातील ही काही जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यामध्ये लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर लातूर आणि संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहेउर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
तर उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर पाहायला मिळणार आहेअहिल्यानगरला पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर नाशिकला पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातही वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहेबुलढाणाअकोलाअमरावतीवाशिमयवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Rain Alert : पुढील तीन दिवस महत्त्वाचे, राज्यामध्ये पावसाचं धुमशान, या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement