उन्हामुळे AC चा होतोय 'स्फोट'! तुमचा AC सुरक्षित आहे का? वेळीच घ्या 'ही' काळजी, नाहीतर..
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
उन्हाची तीव्रता जसजशी वाढत आहे, तसतसं ए.सी. स्फोट होण्याच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. एसी तज्ज्ञ भारत यांनी सांगितलं की, चुकीच्या पद्धतीने नायट्रोजन प्रेशर टाकून गॅस चेक केला जातो आणि...
उन्हाची तीव्रता जसजशी वाढत आहे, तसतसं ए.सी. स्फोट होण्याच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. त्यामध्ये लोकांचं खूप मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे जीवसही धोका निर्माण होतोय. या पार्श्वभूमीवर एसीच्या स्फोटाची कारणं काय आणि ते होऊन नये म्हणून कोणती दक्षता घ्यावी, हे तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घेऊया...
advertisement
advertisement
advertisement
भारत म्हणतो की, ए.सी.मध्ये गॅस लीकेज असल्याशिवाय त्यात नवीन गॅस भरू नये. तसेच, ए.सी.मध्ये कोणत्याही प्रकारचा प्रेशर देण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी करणं खूप आवश्यक आहे. ए.सी.ची देखभाल नियमितपणे आणि वेळेवर केली पाहिजे. विशेषतः उन्हाळ्यात किमान दोन वेळा तरी ए.सी.ची सर्व्हिसिंग करून घ्यावी, जेणेकरून कोणतीही मोठी अडचण येणार नाही.
advertisement
त्याने असंही सांगितलं की, ए.सी. नेहमी मोकळ्या आणि हवेशीर जागीच लावावा. जिथे ए.सी.च्या बाहेरच्या युनिटला कमीतकमी 7 ते 8 फूट व्हेंटिलेशन मिळेल, याची काळजी घ्यावी. यामुळे ए.सी.ची उष्णता सहजपणे बाहेर जाईल आणि आतलं तापमान जास्त वाढणार नाही. जर आपण अशा प्रकारे थोडीशी खबरदारी घेतली, तर ए.सी. फुटण्यासारखे गंभीर अपघात अगदी सहजपणे टाळता येतात.


