Weather Report: कोकणात उष्णतेची लाट, नागपूरही तापलं, पुढील 24 तासांसाठी अलर्ट

Last Updated:

Weather Update Today: फेब्रुवारीच्या शेवटी राज्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. मुंबईत उन्हाचा तडाखा तर मराठवाड्यात ढगाळ हवामानाचं सावट असणार आहे.

+
Weather

Weather Report: कोकणात उष्णतेची लाट, नागपूरही तापलं, पुढील 24 तासांसाठी अलर्ट

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
पुणे: मार्च महिन्याच्या सुरवातीला 2 दिवस राज्यातील तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना 4 मार्चसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत तुरळक जिल्ह्यांतील तापमानात मोठी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील 24 तासांतील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
राज्यात 4 मार्चला सर्वत्र कोरडे हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी मुख्यत: निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. मुंबईत मंगळवारी मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके राहील. मुंबईतील तापमानात काहीशी घट झाल्याने तेथील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुढील काही दिवसांत मुंबईतील तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 4 मार्चला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील काही दिवसांत पुण्यातील तापमानात आणखी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 मार्चला निरभ्र आकाश राहून तेथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तेथील तापमानात देखील पुढील काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागू शकतो.
advertisement
नाशिकमधील तापमानात देखील पुढील काही दिवसांत बहुतांश वाढ होणार आहे. नाशिकमध्ये 4 मार्चला मुख्यतः निरभ्र आकाश राहून तेथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्यानं तेथील नागरिकांना काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
नागपूरमध्ये 4 मार्चला अंशतः ढगाळ वातावरण असून तेथील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमधील तापमानात पुढील काही दिवसांत काहीशी घट होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील तापमानात मार्च महिन्यात 2 दिवस घट बघायला मिळाली. आता त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होऊन सर्वाधिक तापमान 38 ते 39 अंश पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Weather Report: कोकणात उष्णतेची लाट, नागपूरही तापलं, पुढील 24 तासांसाठी अलर्ट
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement