Weather Report: पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे चटके, थंडी गायब, मागच्या वर्षातला रेकॉर्डही मोडला, पाहा आजचं हवामान
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Weather update: गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात मोठी वाढ झालीये. कोल्हापूर, सांगलीत पारा 36 अंशांवर गेला आहे.
पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांत उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील उन्हाची तीव्रता जाणवत असून काही ठिकाणी पारा 36 अंशांवर गेला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत दिसत होती. आता मात्र गारठा गायब होत असून उष्णतेचा जोर वाढत असल्याचे चित्र आहे. आज, 7 फेब्रुवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
पुणे शहरातील हवामान 7 फेब्रुवारीला स्वच्छ आणि निरभ्र राहण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस पर्यंत तर, किमान तापमानात 14 अंशांवर राहली. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी उष्णतेचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
कोल्हापूरमध्ये देखील हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस इतके राहील. तर किमान तापमानात 15 अंशावर राहील. उष्णतेमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या पाण्याच्या व्यवस्थेवर लक्ष द्यावे लागेल. शेती पिकांना अधिक पाणी लागेल.
advertisement
साताऱ्यात आज शुक्रवारी हवामान उष्ण आणि निरभ्र राहील. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमानात 16 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथील नागरिकांना दुपारच्या वेळी उन्हात जाणं टाळावं.
सोलापूरमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. जिल्ह्यात कमाल तापमान 34 अंश तर किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तापमान वाढीमुळे उकाडा जाणवणार आहे. तसेच दुपारी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.
advertisement
सांगलीतही 7 फेब्रुवारीला हवामान उष्ण राहील. येथे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमानात 17 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेमुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या पाण्याच्या व्यवस्थेवर लक्ष देणे गरजेचे आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 07, 2025 7:38 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Weather Report: पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचे चटके, थंडी गायब, मागच्या वर्षातला रेकॉर्डही मोडला, पाहा आजचं हवामान