लाईफ पार्टनर नेमका कसा हवा? पुणेकर लग्नाळू GEN-Z चा भलत्याच अपेक्षा
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
पुण्यातील तरुणांच्या लग्नाविषयीच्या अपेक्षा जाणून घेतल्या आहेत. त्यांना त्यांचा लाईफ पार्टनर कसा हवा आहे? लाईफ पार्टनरकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ? जाणून घेऊयात...
प्रतिनिधी पूजा सत्यवान पाटील, पुणे
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अकोल्यातील एका तरुणाने पत्र लिहून लग्नासाठी मुलगी मिळत नाही, अशी आपली अडचण मांडली. त्यानंतर लग्नव्यवस्था, वाढत्या अपेक्षा आणि लग्नाला होत असलेला उशीर या मुद्यावर पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आम्ही पुण्यातील तरुणांच्या लग्नाविषयीच्या अपेक्षा जाणून घेतल्या आहेत. त्यांना त्यांचा लाईफ पार्टनर कसा हवा आहे? लाईफ पार्टनरकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ? जाणून घेऊयात...
advertisement
तरुण-तरुणींच्या लग्नाविषयी अनेक अपेक्षा असल्याचे समोर आले आहे. मुलांच्या मतानुसार, मुलगी समजूतदार असावी, घराची जबाबदारी सांभाळणारी आणि घरच्या वातावरणाशी जुळवून घेणारी असावी. तर मुलींनी सांगितले की, लग्नानंतर मुलांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन घालू नये, आम्ही मुलाच्या घरच्यांची काळजी घेण्यास तयार आहोत, पण त्यांनीही आम्हाला समजून घ्यावे आणि साथ द्यावी. तसेच लग्नानंतर आमच्या करिअरविषयी विचार मुलांनी करावा. मुलगा थोडाफार सेटल असावा आणि त्याला चांगली नोकरी असावी, अशीही त्यांची अपेक्षा आहे.
advertisement

'माझं लग्न होणार नाही, मी एकटाच राहील' 34 वर्षांच्या लग्नाळू तरुणाचं थेट शरद पवारांना पत्र
लग्न उशिरा होण्यामागे दोन्ही बाजूंच्या वाढत्या अपेक्षा कारणीभूत असल्याचे चित्र समोर येत आहे. मुलींना थोडफार तरी सेटल असणारा मुलगा हवा आहे, तर मुलांनी सांगितलं की 26- 27 व्या वर्षी पूर्णपणे सेटल होणे कठीण आहे. या परस्पर अपेक्षांमुळेच लग्न लांबणीवर पडत असल्याचे दिसून आलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 19, 2025 5:32 PM IST









