कुंडलीत 'हा' 1 योग असेल तर व्यक्ती आयुष्यभर राजासारखं जगते! कसलीच कमी भासत नाही
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
काहीजणांच्या कुंडलीत राजयोग असतो. काही राजयोग हे आर्थिक परिस्थितीशी संबंधित असतात. ज्यांमुळे ती व्यक्ती धनसंपत्तीने समृद्ध राहिल हे कळतं, असे नेमके कोणते योग असतात, पाहूया.
परमजीत, प्रतिनिधी
देवघर : हिंदू धर्मात बाळाच्या जन्मानंतर त्याची जन्मवेळ, जन्मतिथी आणि जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्र कोणत्या स्थितीत होते यावरून कुंडली तयार केली जाते. या कुंडलीवरून त्या बाळाचा स्वभाव कसा असेल, त्याचं आयुष्य कसं असेल, त्याला काय सुख मिळेल, कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल याचा अंदाज येतो. काहीजणांच्या कुंडलीत राजयोग असतो. काही राजयोग हे आर्थिक परिस्थितीशी संबंधित असतात. ज्यांमुळे ती व्यक्ती धनसंपत्तीने समृद्ध राहिल हे कळतं, असे नेमके कोणते योग असतात, पाहूया.
advertisement
ज्योतिषशास्त्र सांगतं की, आपल्या आयुष्यात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीनुसार घडामोडी घडत असतात आणि ग्रह-तारे वेळोवेळी आपली चाल, स्थिती बदलतात. शनी हा नवग्रहांमधला सर्वात धिम्या गतीचा ग्रह मानला जातो. असं म्हणतात की, एका राशीत शनीचा मुक्काम किमान अडीच वर्ष असतो. दरम्यान, कुंडलीत राजयोग नेमके कसे निर्माण होतात याबाबत देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
ज्योतिषांनी सांगितलं की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शश किंवा पंच महापुरुष यापैकी कोणताही राजयोग असेल तिच्या नशिबाचं दार कधीही उघडू शकतं. शनीपासून तयार होणाऱ्या या योगामुळे व्यक्ती अक्षरश: राजासारखं आयुष्य जगू शकते. तिला कधीच पैशांची कमतरता भासत नाही.
advertisement
कसा तयार होतो शश राजयोग, नेमका काय पडतो प्रभाव?
जर कुंडलीत शनी केंद्रस्थानी किंवा उच्चस्थानी असेल किंवा लग्न स्थानापासून, चंद्र स्थानापासून 1, 4, 7, 10व्या स्थानी तूळ, मकर किंवा कुंभ विराजमान असेल तर शश राजयोग तयार होतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो तिची आर्थिक स्थिती कमालीची सुधारते. शिवाय भविष्यात त्या व्यक्तीला प्रचंड प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असते. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म गरीब कुटुंबात झाला असेल आणि तिच्या कुंडलीत शश राजयोग असेल तर तिचं नशीब तिला कोट्यधीश बनवतं. शिवाय त्या व्यक्तीची समाजातली प्रतिष्ठाही कमालीची वाढते.
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Deoghar,Jharkhand
First Published :
May 14, 2024 9:33 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
कुंडलीत 'हा' 1 योग असेल तर व्यक्ती आयुष्यभर राजासारखं जगते! कसलीच कमी भासत नाही