advertisement

Braham Muhurt: विशेष दैवी शक्ती प्राप्त असणाऱ्यांच्या बाबतीतच असं घडतं! पूर्वजन्मीच्या चांगल्या कर्मांचे फळ

Last Updated:

Braham Muhurt: वेद आणि पुराणांनुसार ब्रह्म मुहूर्तावर वातावरण अत्यंत सात्विक असते. या वेळी केलेली पूजा किंवा प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते असे मानले जाते. जर तुमची या वेळी जाग येत असेल, तर तुमच्यावर ईश्वराची विशेष कृपा होणार आहे, असा याचा अर्थ होतो.

News18
News18
मुंबई : सकाळी लवकर उठणे ही खूप चांगली सवय आहे. सकाळी लवकर उठून आपल्या कामाला सुरुवात करणारी कोणतीही व्यक्ती त्याच्या जीवनात यशस्वी होते. अनेक लोकांना दररोज पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान आपोआप जाग येते. हिंदू धर्मात ही वेळ अत्यंत पवित्र मानली गेली असून तिला ब्रह्म मुहूर्त असे म्हटले जाते. शास्त्रानुसार ही वेळ ईश्वराची साधना, जप आणि ध्यानासाठी सर्वोत्तम असते. जर तुमचीही या वेळी रोज जाग येत असेल, तर धार्मिक दृष्टीकोनातून ही साधी गोष्ट मानली जात नाही.
वेद आणि पुराणांनुसार ब्रह्म मुहूर्तावर वातावरण अत्यंत सात्विक असते. या वेळी केलेली पूजा किंवा प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते असे मानले जाते. जर तुमची या वेळी जाग येत असेल, तर तुमच्यावर ईश्वराची विशेष कृपा होणार आहे, असा याचा अर्थ होतो. धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येकाला ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्याची संधी मिळत नाही. हे पूर्वजन्मातील चांगल्या कर्मांचे फळ मानले जाते. ज्यांच्यावर दैवी शक्ती प्रसन्न असते, तेच लोक या वेळी आपोआप जागे होतात.
advertisement
शास्त्रात असे सांगितले आहे की, पहाटेच्या आधीची वेळ ही दैवी शक्ती सक्रिय होण्याची वेळ असते. 3 ते 4 च्या दरम्यान जाग येणे हा देवी-देवतांच्या आशीर्वादाचा संकेत मानला जातो. अशा वेळी आपल्या कुलदेवतेचे किंवा इष्ट देवाचे स्मरण करणे खूप शुभ ठरते. धर्मांनुसार मनुष्य केवळ शरीर नसून एक आत्मा आहे. जेव्हा आत्मा जागृत होऊ लागतो, तेव्हा व्यक्तीचे मन अध्यात्माकडे वळू लागते. ब्रह्म मुहूर्तावर डोळे उघडणे हे तुमच्या आत्मिक प्रगतीचे लक्षण असू शकते.
advertisement
आयुर्वेद आणि अष्टांग हृदयम् सारख्या ग्रंथांमध्येही सूर्योदयापूर्वी उठणे श्रेष्ठ मानले आहे. या वेळी उठून स्नान, ध्यान आणि जप केल्याने बुद्धी तल्लख होते आणि दोषांचा नाश होतो.
advertisement
तुम्हाला या वेळात जाग आली, तर लगेच मोबाईल पाहू नका. अंथरुणावर बसूनच देवाचे नाव घ्या किंवा 'ॐ' मंत्राचा जप करा. आपल्या इष्ट देवाला नमस्कार करा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे दिवसभर मनामध्ये सकारात्मकता टिकून राहते.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Braham Muhurt: विशेष दैवी शक्ती प्राप्त असणाऱ्यांच्या बाबतीतच असं घडतं! पूर्वजन्मीच्या चांगल्या कर्मांचे फळ
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement