advertisement

उद्या महाशिवरात्री! 'या' रंगांचे कपडे टाळाच, अन्यथा ओढवून घ्याल महादेवाचा कोप; होईल मोठं नुकसान

Last Updated:

उद्या, 15 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

News18
News18
Avoid This Colour Clothes On Mahashivratri : उद्या, 15 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. महाशिवरात्रीला महादेवाची कृपा मिळवण्यासाठी आपण उपवास, अभिषेक आणि पूजा करतो. मात्र, शास्त्रानुसार पूजेच्या वेळी आपण कोणत्या रंगाचे कपडे परिधान करतो याला अनन्यसाधारण महत्व आहे. काही विशिष्ट रंगांचे कपडे परिधान केल्यास महादेवाचा कोप ओढवू शकतो आणि पूजेचे फळ मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकते, असे मानले जाते.
महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे टाळावेत?
काळा रंग - सक्त मनाई
महाशिवरात्रीला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका. हिंदू धर्मात आणि विशेषतः शिवपुराणात काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. भगवान शंकराला काळा रंग अजिबात प्रिय नाही. असे मानले जाते की, या दिवशी काळे कपडे घातल्याने महादेवाचा क्रोध ओढवू शकतो आणि जीवनात आर्थिक व मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या दिवशी काळ्या साड्या, शर्ट किंवा बांगड्या टाळाव्यात.
advertisement
गडद किंवा भडक रंगाचे कपडे
अतिशय भडक किंवा गडद रंगाचे कपडे या दिवशी आवर्जून टाळावेत. जांभळा किंवा अत्यंत भडक निळा रंग पूजेच्या वेळी टाळणे हिताचे ठरते. पूजा ही सात्त्विक असते, त्यामुळे शांत आणि सौम्य रंगांना प्राधान्य द्यावे.
पूजेसाठी कोणते रंग शुभ मानले जातात?
हिरवा रंग : हा महादेवाचा सर्वात आवडता रंग मानला जातो. बेलाचे पान, धतुरा आणि निसर्ग हिरवा असल्याने, या रंगाचे कपडे घातल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात.
advertisement
पांढरा रंग : पांढरा रंग शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. महादेवाचे स्वरूपही 'कर्पूरगौरं' असल्याने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ ठरते.
केशरी किंवा पिवळा : हे रंग मांगल्याचे प्रतीक आहेत. कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेत हे रंग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
लाल रंग : विवाहित महिलांनी लाल रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करणे सौभाग्यकारक मानले जाते.
advertisement
सुती कपड्यांना प्राधान्य: शक्य असल्यास रेशमी किंवा सुती कपडे परिधान करावेत. पूजेच्या वेळी चामड्याच्या वस्तू स्वतःजवळ ठेवू नका.
स्वच्छता महत्त्वाची: नवीन कपडे नसले तरी चालतील, पण जे कपडे तुम्ही परिधान कराल ते स्वच्छ आणि धुतलेले असावेत.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
उद्या महाशिवरात्री! 'या' रंगांचे कपडे टाळाच, अन्यथा ओढवून घ्याल महादेवाचा कोप; होईल मोठं नुकसान
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement