सुख-समृद्धीसाठी देवशयनी एकादशीला करा हे उपाय; सर्व समस्यांतून होईल सुटका
- Published by:Prachi Dhole
- trending desk
Last Updated:
दर महिन्याला एकादशी असते; पण देवशयनी (आषाढी) एकादशीचं महत्त्व जास्त आहे. या दिवशी काही खास उपाय केले तर जीवनात सुख-समृद्धी येते आणि पैशांची कमतरता भासत नाही.
जीवनात सुख-समृद्धीसह भरपूर पैसा मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. या गोष्टी मिळाव्यात यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. दर महिन्याला एकादशी असते; पण देवशयनी (आषाढी) एकादशीचं महत्त्व जास्त आहे. या दिवशी काही खास उपाय केले तर जीवनात सुख-समृद्धी येते आणि पैशांची कमतरता भासत नाही.
सोमवारी न चुकता शिवलिंगावर अर्पण करा या 5 गोष्टी, सर्व अडचणी होतील दूर
हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्यास गेल्या जन्मातल्या पापांपासून मुक्ती मिळते. जीवनातल्या समस्या दूर होतात, असं मानलं जातं. दर वर्षी 24 एकादश्या येतात. यात प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगळं आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या देवशयनी एकादशीचं महत्त्व जास्त आहे. यंदा 17 जुलैला देवशयनी एकादशी आहे. शास्त्रानुसार ही पुण्यप्रद तिथी मानली जाते. या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या दिवशी केलेल्या उपायांमुळे लक्ष्मीमातेची कृपादृष्टी लाभते.
advertisement
देवशयनी एकादशीला तुळशीच्या रोपाची पूजा विशेष फलदायी मानली जाते. तुळस भगवान विष्णूला विशेष प्रिय आहे. या दिवशी सकाळी आणि सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. या दिवशी उपवास करावा. फलाहार करावा. आहारात पिवळी फळं खावीत. यामुळे संबंधित व्यक्तीला धनलाभ होतो.
देवशयनी एकादशीला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. त्यानंतर त्यांना मखाणाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास अन्य देवतांनादेखील खिरीचा नैवेद्य दाखवावा. विष्णुसहस्रनामासह लक्ष्मी स्तोत्र वाचावं. यामुळे धन आगमनाचे मार्ग खुले होतात.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार, देवशयनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या कापडात पिवळी आणि गोड फळं बांधावीत किंवा गरीब-गरजूंना ही फळं दान करावीत. यामुळे ग्रहदोष दूर होतात. तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूची आराधना करावी. पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे जीवनातल्या अडचणी दूर होऊन धन-धान्यवृद्धी होते.
नोकरीत समस्या असेल किंवा नवीन नोकरीच्या शोधात असाल तर देवशयनी एकादशीला घराजवळच्या मंदिराच्या कळसावर किंवा मंदिराच्या छतावर पिवळ्या रंगाचा ध्वज लावावा. लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूची आराधना करावी. भगवान विष्णूला पिवळी फुलं आणि पिवळी वस्त्रं अर्पण करावी. तसंच पिवळ्या रंगाची मिठाई, केळी किंवा अन्य पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. विष्णुसहस्रनामाचं पठण करावं. यामुळे नोकरीतल्या समस्या दूर होतील.
advertisement
किती भाग्यवान आहात तुम्ही हे चेहऱ्यावरील तीळ सांगतात, जाणून घ्या खास गोष्टी
ज्योतिषशास्त्रानुसार, देवशयनी एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावं. भगवान विष्णूची आराधना करावी. या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे शक्य असल्यास पिवळं वस्त्र परिधान करावं. देवघरात भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना करावी. त्यानंतर भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. पिवळ्या रंगाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. या उपायांमुळे कामात प्रगती होते आणि सर्व कामांत यश मिळतं.
advertisement
((सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2024 7:33 AM IST


