सोमवारी न चुकता शिवलिंगावर अर्पण करा या 5 गोष्टी, सर्व अडचणी होतील दूर
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
असे म्हणतात की भोलेनाथ हा अत्यंत साधा, सौम्य, निरागस असून भक्तांवर लवकर प्रसन्न होतो. मान्यतेनुसार, सोमवारी शिवलिंगावर भगवान शंकराला प्रिय वस्तू अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात.
सोमवार हा भगवान शिवाला समर्पित दिवस आहे. या दिवशी भगवान शिवाची उपासना करणे फार महत्त्वाचे मानले जाते. भगवान शिवाला आशुतोष म्हणजेच सहज प्रसन्न होणारी देवता म्हणतात. या दिवशी भक्त महादेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध उपाय करतात.
असे म्हणतात की भोलेनाथ हा अत्यंत साधा, सौम्य, निरागस असून भक्तांवर लवकर प्रसन्न होतो. मान्यतेनुसार, सोमवारी शिवलिंगावर भगवान शंकराला प्रिय वस्तू अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात.
1. एक तांबे पाणी अर्पण केल्यानेही भगवान शिव प्रसन्न होतात. सोमवारी सकाळी स्नान करून शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण केल्यास महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
advertisement
Rashi Bhavishya: आज या 4 राशींना प्रत्येक कामात यश, मानसन्मान मिळेल
2. सोमवारी शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने सुख-समृद्धी मिळते. शिवलिंगावर साखरेचा अभिषेक केल्याने सुख-समृद्धी मिळते.
3. सोमवारी शिवलिंगाला अत्तर अर्पण केल्याने शिव प्रसन्न होतो. दुसरीकडे, दूध अर्पण केल्याने तुमचे आरोग्य नेहमीच चांगले राहते. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
4. सोमवारी शिवलिंगावर दही आणि तूप अर्पण केल्यानेही भगवान शिव प्रसन्न होतात. शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतात.
advertisement
या जन्मतारखेच्या व्यक्तींनी वाहन जपून चालवा, अपघात होण्याची शक्यता
5. सोमवारी शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने भोलेनाथही प्रसन्न होतात. शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळतो. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2024 11:11 AM IST


