advertisement

माहेरी आलेल्या गौरीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात माहितीय? पौराणिक अख्यायिकेत दडलंय कारण

Last Updated:

महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये गौरीला गोडाचा नैवेद्य दाखवला जात असला तरीही कोकणात मात्र तिला तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.

महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये गौरीला गोडाचा नैवेद्य दाखवला जात असला तरीही कोकणात मात्र तिला तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.
महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये गौरीला गोडाचा नैवेद्य दाखवला जात असला तरीही कोकणात मात्र तिला तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.
गणपती पाठोपाठ अतिशय उत्साहात गौरीचे आगमन होते. गौरीच्या आगमनाने घरातील आनंद द्विगुणित होतो. माहेरी आलेल्या गौरीचे कोडकौतुक केले जाते. तिच्या आवडीच्या वेगवेगळ्या गोष्टीही केल्या जातात. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी अगदी पारंपारिक पद्धतीने गौराईचा सण साजरा केला जातो. तिला भाजी-भाकरी, फराळ, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.
गौरीच्या आगमनानंतर कोकणातील महिला एकत्र येऊन झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे वेगवेगळे खेळ खेळले जातात. गौराईसह रात्र जागवली जाते. सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडून दिली जात नाही. तिला खूश करण्यासाठी तिच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी केल्या जातात.
advertisement
महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये गौरीला गोडाचा नैवेद्य दाखवला जात असला तरीही कोकणात मात्र तिला तिखटाचा म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणात ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. या नैवेद्यामध्ये गौराईसाठी वडे मटण, चिकन, खेकडे, मासे यांचा समावेश असतो. इतकंच नाही तर काही ठिकाणी गौरीसाठी दारू देखील ठेवली जाते. असे करण्यामागे काय कारण असेल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का. आज आपण करण्यामागचे कारण जाणून घेऊया.
advertisement

गौरीला तिखटाचा नैवेद्य दाखवण्यामागची अख्यायिका

पौराणिक कथांनुसार, गौराईचे भगवान शंकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा त्यांनी तिच्या रक्षणासाठी आपले भूतगण तिच्यासोबत पाठवले. गौराईला माहेरी आलेले पाहून तिच्या घरच्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी तिचे कोडकौतुक केले. तिची पूजा केली. तिला गोडधोड खायला बनवलं. तिचा चांगला पाहुणचार केला. मात्र यावेळी गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना सर्व जण विसरले. ही गोष्ट गौराईच्या लक्षात आली.
advertisement
शंकराचे भूतगणांना स्मशानात रहायची सवय असल्याने ते मांसाहार करत असत. त्यांची अडचण गौरी समजली आणि तिने भूतगणांसाठी मांसाची व्यवस्था करायला लावली आणि त्यांना मांसाहार मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले. या प्रसंगाची आठवण ठेऊन जेव्हा गौरी घरी येते तेव्हा तिच्याबरोबर भूतगण आहेत असे गृहीत धरून त्यांच्यासाठी मटण केले जाते. ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे. त्या दिवशी मटण करतात पण त्याचा नैवेद्य गौरीला दाखवला जात नाही. तर तिच्या सोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
माहेरी आलेल्या गौरीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात माहितीय? पौराणिक अख्यायिकेत दडलंय कारण
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement