गणरायाची आरती म्हणताना तुम्हीही 'या' चुका करता का? 99 टक्के लोकांना हे माहित नाही
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
गणपती बाप्पा आल्यावर त्यांची पूजा करताना वेगवेगळ्या आरत्या म्हटल्या जातात. मात्र या आरत्या म्हणताना अनेकजण चुकाही करतात.
नवी दिल्ली: प्रत्येक गणेशभक्त आतुरतेने गणेशोत्सवाची वाट पाहत असतो. दरम्यान भक्तांची प्रतीक्षा संपली असून वाजतगाजत आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पा आल्यावर त्यांची पूजा करताना अनेक आरत्या म्हटल्या जातात. 'सुखकर्ता दुःखहर्ता', 'शेंदुर लाल चढ़ायो', 'दुर्गे दुर्घट भारी', 'येई हो विठ्ठले', 'घालीन लोटांगण' अशा अनेक आरत्या यावेळी म्हटल्या जातात. मात्र या आरत्या म्हणताना अनेक चुकाही होतात.
अनेकदा गणेशभक्त आरती म्हणताना सर्रास शब्दांची अदलाबदल करतात. अनेकांना आरती पाठच नसते आणि दुसरं म्हणजे पाठ असली तरी उच्चार आणि शब्द नीट ठाऊक नसतात. तुम्हीही आरती म्हणताना शब्दांची जागा किंवा उच्चार चुकवता का? काही हरकत नाही. आज आपण आरती म्हणताना होणाऱ्या काही सामान्य चुका आणि आरतीची योग्य शब्दरचना जाणून घेऊया.
advertisement
- 'लवलवती विक्राळा' नाही तर 'लवथवती विक्राळा'
- 'ओवाळू आरत्या सुरवंट्या येती' नाही तर 'कुरवंड्या येती'
- 'फळीवर वंदना' नाही तर 'फणिवरबंधना'
- 'ओटी शेंदुराची' नाही तर 'उटी शेंदुराची'
- 'कायेन वाचा मच्छिंद्र देवा' नाही तर 'मनसेंद्रियैर्वा'
- 'संकष्टी पावावे' नाही तर 'संकटी पावावे'
- 'वक्रतुंड त्रिनेमा' नाही तर 'वक्रतुंडत्रिनयना'
- 'दास रामाचा वाट पाहे सजणा' नाही तर 'वाट पाहे सदना'
- 'दीपकजोशी नमोस्तुते' नाही तर 'दीपज्योती नमोस्तुते'
advertisement
आरतीमध्ये सर्रास होणाऱ्या या काही चुका आहेत. तुमच्याकडूनही आरती म्हणताना या चुका होत असतील तर तुम्हाला हे योग्य उच्चार नक्कीच मदत करतील. आजच या चुका सुधारा, तसेच आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या लक्षात आणून द्या आणि बाप्पाची मनोभावे भक्ती करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 07, 2024 7:36 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
गणरायाची आरती म्हणताना तुम्हीही 'या' चुका करता का? 99 टक्के लोकांना हे माहित नाही





