Ganesh Festival: फुलांनी नाही तर लोण्याने केला जातो श्रृंगार, पाहा कुठे आहे ही गणपती बाप्पांची खास मूर्ती
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Ganesh Festival: गणपती बाप्पांच्या या प्राचीन मंदिराचं नाव डोडा गणपती मंदिर आहे. हे मंदिर बंगळुरूच्या बसावनगुडीमध्ये आहे. कन्नडमध्ये डोडाचा अर्थ मोठा असा होतो. अशा वेळी या मंदिराचा अर्थ गणपतीचं मोठं मंदिर. या मंदिरात गणपती बाप्पांची विशाल मूर्ती आहे. ही मूर्ती जवळपास 18 फूट उंच आहे 16 फूट रुंद आहे.
मुंबई : गणोशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येकजण गणपती बाप्पांची आतुरतेने वाट पाहत आहे. मंडळांची बाप्पांच्या आगमनाची तयारी जवळजवळ पूर्ण होत आलीये. दरम्यान आम्ही तुम्हाला एका खास गणपतीविषयी माहिती देणार आहोत. गणपती बाप्पांचं एक असं अनोखं मंदिर आहे जिथे श्रृंगार फूलांनी नाही तर लोण्याने केला जातो. हे मंदिर बंगळुरुमध्ये आहे. या मंदिरात दर्शनासाठी देशाच्या कान्या-कोपऱ्यातून लोक येतात. आज आपण या मंदिराविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. या मंदिराचा इतिहास टीपू सुल्तानशी जोडला आहे.
डोडा गणपती मंदिर असे या प्राचीन मंदिराचे नाव आहे
गणपतीच्या या प्राचीन मंदिराचे नाव डोडा गणपती मंदिर आहे. हे मंदिर बंगळुरूच्या बसवानगुडी येथे आहे. डोडा म्हणजे कन्नडमध्ये मोठा. म्हणजेच हे मंदिर म्हणजे गणपतीचे मोठे मंदिर आहे. या मंदिरात सुमारे 18 फूट उंच आणि 16 फूट रुंद गणेशाची भव्य मूर्ती आहे. विशेष बाब म्हणजे या मंदिरात एकाच काळ्या ग्रेनाईट दगडावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे.
advertisement
हे मंदिर कधी बांधले गेले?
गणेशाचे हे मंदिर बंगळुरूच्या नंदी मंदिराच्या मागे बांधण्यात आलंय. नंदी मंदिराबाबत असा दावा केला जातो की, जगातील सर्वात मोठी नंदी मूर्ती येथे स्थापित आहे. डोडा गणपती मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे असं देखील म्हटलं जातं. हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 1537 च्या सुमारास गौर शासकांनी बांधले होते. मंदिरात तुम्हाला प्राचीन दक्षिण भारतीय वास्तुकला पाहायला मिळतील. मंदिराच्या गर्भगृहात काळ्या रंगाची गणेशमूर्ती आहे.
advertisement
लोण्याने केला जातो श्रृंगार
या मंदिराची सर्वात मोठी विचित्र गोष्ट म्हणजे येथे भगवान फुलांनी नाही तर लोणीने सजवलेले आहेत. या मंदिरात श्रीगणेशाला 100 किलो लोण्याने सुशोभित केले आहे. या सजावटीला 'बेने अलंकार' म्हणतात. एवढेच नाही तर येथील गणपतीच्या मूर्तीवर लावलेले लोणी कधीही वितळत नाही. देवाच्या मूर्तीवर लावलेले लोणी प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटले जाते. या मंदिरात बसून टिपू सुलतानच्या सेनापतीने इंग्रजांविरुद्ध डावपेच आखले होते, असे सांगितले जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2023 2:26 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh Festival: फुलांनी नाही तर लोण्याने केला जातो श्रृंगार, पाहा कुठे आहे ही गणपती बाप्पांची खास मूर्ती