Ganesh Chaturthi 2023: आज गणेश चतुर्थीला पाहू नका चंद्र! चुकून चंद्र दिसला तर या उपायाने दूर करा दोष
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
do not see moon on ganesh chaturthi: आज मंगळवारी गणेश चतुर्थी आहे. गणपती बाप्पांच्या श्रापामुळे चतुर्थीला चंद्रमाचे दर्शन करत नाहीत. याची कथा काय आहे आणि चुकून चंद्र पाहिल्यावर काय करावे याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई : आज मंगळवारी गणेश चतुर्थी आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. यामुळे या दिवशी गणेश जयंती साजरी करतात. या तिथीचा गणपती बाप्पांशी संबंध आहे. म्हणूनच या तिथीला गणेश चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला गणेश संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रामाला पाहणे वर्जित असते. विनायक चतुर्थीच्या दिवशीही चंद्रमा पाहू शकत नाही. यामुळे दोष लागतो. जर तुम्ही गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्यास तुमची प्रतिमा कलंकित होऊ शकते. असे का घडते यासाठी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित प्रसंग जाणून घ्यावा लागेल. गणेश चतुर्थीला चंद्र दिसल्यानंतर दोष दूर करण्याचे उपायही आहेत.
गणेश चतुर्थी 2023 ला चंद्रोदय कधी होईल?
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा सांगतात की गणेश चतुर्थीला म्हणजेच शुक्ल पक्षातील चतुर्थीला चंद्र सकाळी उगवतो. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ सकाळी 09:45 वाजता आहे आणि चंद्रास्त रात्री 08:44 वाजता आहे. या आधारावर पाहिले तर आज चंद्र सुमारे 11 तास दिसेल. आज चंद्राचं दर्शन घेऊ नका.
advertisement
गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये?
पौराणिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहिल्यास माणसावर खोटा कलंक लागतो. यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते आणि तुमची प्रतिष्ठा आणि सन्मानला हानी पोहोचू शकते. भगवान श्रीकृष्णाने द्वापर युगात चौथचा चंद्र पाहिला तेव्हा त्यांच्यावर चोरीचा खोटा आरोप लावण्यात आला होता.
गणपतीने दिला होता चंद्राला शाप
एकदा गणपती जेवत असताना त्याचे रूप पाहून चंद्रदेव त्याची थट्टा करू लागले. यावर भगवान गणेश क्रोधित झाले आणि त्यांनी चंद्रदेवांना शाप दिला की त्यांचा प्रभाव नष्ट होईल आणि सर्व कला देखील नष्ट होतील. जो तुम्हाला पाहील त्यालाही दोष लागेल. नंतर जेव्हा चंद्रदेवांनी क्षमा मागितली तेव्हा गणेशजींनी सांगितले की तुमचा प्रभाव एका महिन्यात 15 दिवस वाढेल आणि 15 दिवस कमी होईल. गणेशाच्या शापामुळे चतुर्थीला चंद्र दिसत नाही.
advertisement
चौथचा चंद्र पाहून भगवान श्रीकृष्णावर रत्न चोरीचा आरोप
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान श्रीकृष्णांनी चौथचा चंद्र पाहिला तेव्हा त्यांच्यावर स्यमंतक रत्न चोरल्याचा आरोप झाला. आता खोट्या कलंकातून मुक्त होण्यासाठी ते स्यमंतक मणीच्या शोधात निघाले. तोच मणी जामवंत यांच्याजवळ होता. जामवंताने सिंहाचा वध करून ते रत्न मिळवले होते. मात्र, सूर्यदेवांनी सत्यभामेच्या वडिलांना स्यमंतक मणि दिली होती. हे परिधान करून त्याचा मुलगा जंगलात गेला, तिथे सिंहाने त्याला मारले आणि रत्न स्वतःकडे ठेवले. स्यमंतक मणी त्या सिंहामार्फत जामवंतापर्यंत पोहोचला.
advertisement
मणीच्या शोधात भगवान श्रीकृष्ण जामवंताच्या गुहेत पोहोचले. तेथे 27 दिवस दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले, ज्यात जामवंतचा पराभव झाला. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना त्यांचे विष्णुस्वरूप दाखवले. जामवंतने आपली कन्या जामवंतीचा विवाह भगवान श्रीकृष्णाशी करून दिला. नंतर स्यमंतक मणि आणि कन्येसह भगवान श्रीकृष्णाला निरोप दिला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णावर स्यमंतक मणीचा चोरीचा आरोप खोटा ठरला.
advertisement
गणेश चतुर्थीला चुकून चंद्र दिसला तर करा हा उपाय
गणेश चतुर्थीला चुकून चंद्र दिसला तर त्याचा दोष टाळण्यासाठी काही ज्योतिषीय उपाय करू शकता. दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रथम श्रीगणेशाची पूजा करावी. त्यानंतर पूजेत वापरलेली फळे, फुले, मिठाई इत्यादी चंद्राला दाखवून गरजूंना दान करा. खोटे कलंक दूर करण्यासाठी खाली दिलेल्या मंत्राचा जप करा.
advertisement
सिंह: प्रसेन मण्वधीत्सिंहो जाम्बवता हत:
सुकुमार मा रोदीस्तव ह्येष: स्यमन्तक:
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2023 1:31 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh Chaturthi 2023: आज गणेश चतुर्थीला पाहू नका चंद्र! चुकून चंद्र दिसला तर या उपायाने दूर करा दोष