Unique Tradition: महाराष्ट्रातील असं गाव, जिथं केली जाते राक्षसिणीची पूजा, लोकांची 3 दिवस असते तुफान गर्दी Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
विविध देवी-देवतांची पूजाअर्चा होत असल्याचं आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच पाहतो. परंतु राक्षसिणीची पूजा होत असल्याचे तुम्ही ऐकलं नसेल किंवा पाहिलं नसेल.
जालना: विविध देवी-देवतांची पूजाअर्चा होत असल्याचं आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच पाहतो. परंतु राक्षसिणीची पूजा होत असल्याचे तुम्ही ऐकलं नसेल किंवा पाहिलं नसेल. परंतु जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथे हिडिंबा नावाच्या राक्षसिणीची पूजा होते. एवढेच नव्हे तर देवीच्या प्रतिकृतीची वाजत-गाजत मिरवणूक देखील काढली जाते. पाहुयात काय आहे ही अनोखी परंपरा.
मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशच्या सीमेवर असलेलं भोकरदन तालुक्यातील पारध हे गाव पराशर ऋषी आणि हिडिंबादेवीसाठी प्रसिद्ध आहे. पोळ्यांनंतर या गावात तीन दिवस देवीचा उत्सव असतो. मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील लोक मोठ्या भक्तीभावाने देवीच्या उत्सवाला येतात.
advertisement
पौराणिक आख्यायिका महाभारताशी संबंधित आहे. पांडव अज्ञातवासात असताना लाक्षागृहातून काम्यक वनात आले. या वनात हिडिंब नावाचा राक्षस राहत होता. त्याने आपली बहीण हिडिंबा हिला पांडवांचा वध करण्यासाठी पाठवलं. परंतु भीमाचं बलदंड शरीर पाहून ती मोहित झाली. तिने सुंदर स्त्रीचे रूप धारण केलं. आपल्या भावाच्या दुष्ट कल्पनेविषयी तिने भीमाला सांगितलं.
बहिणीच्या दुष्ट हेतूविषयी शंका आल्यानंतर हिडिंब राक्षसाने भीमाशी युद्ध पुकारलं. या युद्धात भीमाने हिडिंबचा पराभव केला. कुंती आणि युधिष्ठिर यांच्या परवानगीने हिडिंबा राक्षसिणीशी भीमाने विवाह केला. त्यांना घटोत्कच नावाचा पुत्र झाला, ज्याने महाभारतातील युद्धात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. अशी येथील पुरातन आख्यायिका आहे.
advertisement
त्याचबरोबर या परिसराला दंडकारण्य म्हणून ओळखलं जायचं. इथे पराशर ऋषीने मोठे तप केले. त्यांचे भव्य मंदिर देखील या परिसरामध्ये आहे. देवी विविध संकटांपासून गावकऱ्यांचे संरक्षण करते अशी परिसरातील नागरिकांची श्रद्धा आहे. त्याचबरोबर आसपासच्या परिसरातील लोक देवीला ग्रामदेवता मानतात.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Aug 25, 2025 7:17 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Unique Tradition: महाराष्ट्रातील असं गाव, जिथं केली जाते राक्षसिणीची पूजा, लोकांची 3 दिवस असते तुफान गर्दी Video










