advertisement

100 वर्षांनंतर बनणार दुर्मिळ योग, 3 मार्चला नाही मग, कधी खेळली जाणार रंगाची होळी?

Last Updated:

हिंदू धर्मात होळीचा सण हा आनंदाचा आणि उत्साहाचा मोठा उत्सव मानला जातो. मात्र, 2026 मध्ये होळीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. सामान्यतः ज्या दिवशी होळी दहन होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते.

News18
News18
Holi 2026 : हिंदू धर्मात होळीचा सण हा आनंदाचा आणि उत्साहाचा मोठा उत्सव मानला जातो. मात्र, 2026 मध्ये होळीच्या तारखेबाबत भाविकांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. सामान्यतः ज्या दिवशी होळी दहन होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. परंतु, यंदा 100 वर्षांनंतर असा एक दुर्मिळ खगोलीय आणि ज्योतिषशास्त्रीय योगायोग जुळून येत आहे, ज्यामुळे रंगांची होळी 3 मार्चऐवजी 4 मार्च 2026 रोजी खेळली जाणार आहे.
नेमकं कारण काय?
या गोंधळामागचे नेमकं कारण म्हणजे 'पौर्णिमा तिथीची व्याप्ती' आणि 'भद्रा काळ'. हिंदू पंचांगानुसार, होळीची तारीख ठरवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात. शास्त्रात भद्रा काळात होळी दहन करणे अशुभ मानले जाते. 2026 मध्ये 3 मार्च रोजी दुपारी उशिरापर्यंत भद्रा काळ असण्याची शक्यता आहे. आणि दुसरं म्हणजे, हिंदू धर्मात 'उदया तिथी' महत्त्वाची मानली जाते. 3 मार्च रोजी पौर्णिमा तिथी असली तरी, रंगांची होळी खेळण्यासाठी लागणारी प्रतिपदा तिथी 4 मार्चच्या सूर्योदयात येत आहे.
advertisement
100 वर्षांनंतरचा दुर्मिळ योग
ज्योतिषांच्या मते, 100 वर्षांनंतर असा ग्रहयोग आला आहे की पौर्णिमा तिथी 3 मार्चच्या रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. शास्त्रानुसार, 'होळी दहन' पौर्णिमेच्या रात्री होते आणि 'रंगोत्सव' प्रतिपदेला साजरा होतो. प्रतिपदा तिथी 4 मार्च रोजी सूर्योदयाला सुरू होत असल्याने, धर्मशास्त्राच्या नियमानुसार 4 मार्चलाच रंगांची होळी खेळणे शास्त्रोक्त ठरेल. तसेच खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की भारतात होळीच्या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण दिसणे ही शतकातून एकदाच घडणारी घटना आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या छायाप्रदेशातून जातो तेव्हा तो गडद लाल रंग घेतो, ज्याला "ब्लड मून" म्हणतात. 2026 मध्ये होळीच्या आदल्या दिवशी या "ब्लड मून" दिसणे ही आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या एक महत्त्वाची घटना आहे.
advertisement
या बदलाचा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय परिणाम
3मार्चच्या रात्री होळी दहन केल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होईल. त्यानंतर 4 मार्चला सकाळी जेव्हा नवीन तिथी सुरू होईल, तेव्हा रंगांचा सण साजरा करणे अधिक सकारात्मक फळ देणारे ठरेल. 4 मार्च रोजी चंद्र कन्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करेल आणि बुध-शुक्राची शुभ दृष्टी असेल. हा बदल लोकांच्या जीवनात सुख आणि शांती घेऊन येणारा ठरेल. 4 मार्चला रंगांची होळी खेळताना अनेक शुभ योग जुळून येत आहेत, जे गुंतवणूक आणि नवीन कामांच्या सुरुवातीसाठी उत्तम आहेत.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
100 वर्षांनंतर बनणार दुर्मिळ योग, 3 मार्चला नाही मग, कधी खेळली जाणार रंगाची होळी?
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement