12 मिनिटं ठरणार महत्वाची! होळीला चुकवू नका 'ही' वेळ, आत्ताच नोट करा शुभ मुहूर्त
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
रंगांचा सण म्हणून ओळखली जाणारी 'होळी' 2026 मध्ये एका अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या ज्योतिषीय योगामुळे चर्चेत आहे. यंदा होलिका दहनावर एकाच वेळी 'भद्रा' आणि 'चंद्रग्रहण' अशा दोन मोठ्या अडथळ्यांचे सावट आहे.
Holika Dahan 2026 : रंगांचा सण म्हणून ओळखली जाणारी 'होळी' 2026 मध्ये एका अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या ज्योतिषीय योगामुळे चर्चेत आहे. यंदा होलिका दहनावर एकाच वेळी 'भद्रा' आणि 'चंद्रग्रहण' अशा दोन मोठ्या अडथळ्यांचे सावट आहे. यामुळेच, काही पंचांगकर्त्यांच्या मते, शुभ मुहूर्तावर होळी पेटवण्यासाठी भाविकांना केवळ 12 मिनिटांचा अत्यंत मर्यादित वेळ मिळणार आहे. होळीच्या तारखेबाबत आणि मुहूर्ताबाबत निर्माण झालेला हा संभ्रम दूर करण्यासाठी ज्योतिषांनी शास्त्राचा आधार घेत महत्त्वाची माहिती दिली आहे.
नेमका संभ्रम काय?
2026 मध्ये फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्चच्या सायंकाळपासून सुरू होत असली, तरी त्याच वेळी भद्रा काळ देखील सुरू होत आहे. शास्त्रात 'भद्रा' काळात होलिका दहन करणे अत्यंत अशुभ मानले जाते. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. ग्रहण काळात सुतक पाळावे लागत असल्याने पूजा-अर्चा करणे शक्य नसते. यामुळेच 2 मार्चच्या रात्री भद्रा असताना आणि 3 मार्चला ग्रहण असताना नेमकी होळी कधी पेटवावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
होलिका दहनाचे महत्त्वाचे मुद्दे आणि 12 मिनिटांचे रहस्य
केवळ 12 मिनिटांचा 'प्रदोष' मुहूर्त
काही पंचांगानुसार, 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 06:24 ते 06:36 या दरम्यान प्रदोष काळ आहे. या 12 मिनिटांच्या कालावधीत भद्रेचा मुख भाग सोडून होलिका दहन करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. हा अत्यंत सूक्ष्म मुहूर्त असल्याने वेळेचे पालन करणे आवश्यक ठरेल.
advertisement
भद्रा काळाचे मोठे सावट
2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 वाजता भद्रा सुरू होईल, जी 3 मार्चच्या पहाटे 4:30 पर्यंत राहील. भद्रा काळात होळी पेटवल्याने कुटुंबावर किंवा गावावर संकट येऊ शकते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे भद्रा पुच्छ काळात पर्यायी मुहूर्त सांगितला जात आहे.
चंद्रग्रहणामुळे 3 मार्चला अडथळा
3 मार्च रोजी दुपारी 3:21 पासून चंद्रग्रहणाचे सूतक सुरू होईल. सायंकाळी 6:26 ते 6:46 या वेळेत ग्रहण दृश्यमान असेल. ग्रहण काळात अग्नी प्रज्वलित करणे किंवा धार्मिक विधी करणे शास्त्रात वर्ज्य असल्याने 3 मार्चचा संध्याकाळचा मुहूर्त धोक्यात आला आहे.
advertisement
धुलिवंदन/धुळवड 4 मार्चला
चंद्रग्रहणाच्या सुतकामुळे 3 मार्चला रंग खेळणे शक्य होणार नाही. त्यामुळे देशभरात बुधवार, 4 मार्च 2026 रोजी धुलिवंदन साजरे केले जाईल. ग्रहणाचे शुद्धीकरण झाल्यानंतरच रंगांच्या उत्सवाला सुरुवात होईल.
धर्मसिंधू आणि निर्णयसिंधूचे मत
ज्योतिषांच्या मते, जर पौर्णिमा दोन दिवसांच्या प्रदोष काळात व्याप्त असेल आणि भद्रेचा अडथळा असेल, तर पहिल्या दिवशी भद्रा पुच्छ काळात किंवा भद्रा मुख सोडून प्रदोष काळात होळी पेटवणे शास्त्रसंमत ठरते.
advertisement
शुभ मुहूर्ताचे महत्त्व
होळीच्या अग्नीतून सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि वाईटाचा नाश व्हावा, यासाठी मुहूर्ताची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. चुकीच्या वेळी केलेली होळी हानीकारक ठरू शकते, म्हणून या 12 मिनिटांच्या मुहूर्ताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 5:24 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
12 मिनिटं ठरणार महत्वाची! होळीला चुकवू नका 'ही' वेळ, आत्ताच नोट करा शुभ मुहूर्त









