Rudraksha: तुम्ही सुद्धा रुद्राक्ष धारण केलंय तर चुकूनही करू नका या चुका नाहीतर संकटाना द्याल आमंत्रण
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
शिवपुराणानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली आहे. हे अतिशय चमत्कारिक आणि अलौकिक मानले जाते. रुद्राक्षांची श्रेणी एक मुखी ते एकवीस मुखी आहे. हे धारण केल्याने सर्व प्रकारचे त्रास नष्ट होतात.
भगवान शंकरांना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. रुद्राक्ष हा शिवाचा अंश मानला जातो. रुद्राक्ष धारण करणार्यांवर भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद होतो असे म्हटले जाते. शिवपुराणानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली आहे. हे अतिशय चमत्कारिक आणि अलौकिक मानले जाते. रुद्राक्षांची श्रेणी एक मुखी ते एकवीस मुखी आहे. हे धारण केल्याने सर्व प्रकारचे त्रास नष्ट होतात.
Shani Mantra: शनीची कृपा हवी असेल तर शनिवारी करा या 5 मंत्राचा जप! होईल भाग्योदय
रुद्राक्षाचा महिमा अफाट आहे, पण प्रत्येकाला ते धारण करता येत नाही. रुद्राक्ष धारण केल्यानंतरही काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. चला जाणून घेऊया रुद्राक्षाशी संबंधित या नियमांबद्दल. रुद्राक्ष धारण करण्याचे नियम रुद्राक्ष धारण करताना धाग्याच्या रंगाची काळजी घ्यावी. काळ्या धाग्यात कधीही घालू नये. ते पिवळ्या धाग्यात किंवा लाल धाग्यात घालावे. रुद्राक्ष अत्यंत पवित्र आहे. घाणेरड्या हातांनी चुकूनही स्पर्श करू नये. अंघोळ केल्यावर नेहमी स्वच्छ कपडे घालूनच घाला. रुद्राक्ष धारण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. लक्षात ठेवा जर तुम्ही रुद्राक्ष जपमाळ घातली तर त्यात मण्यांची संख्या विषम असावी. रुद्राक्षाची जपमाळ 27 मणांपेक्षा कमी धारण करू नये. चुकूनही दुसऱ्याचा रुद्राक्ष गळ्यात घालू नका आणि तुमचा रुद्राक्ष दुसऱ्याला देऊ नका.
advertisement
ज्या ठिकाणी रुद्राक्ष धारण करून व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या ठिकाणी जाऊ नये. शोक सभेला उपस्थित राहणे आवश्यक असेल तर रुद्राक्ष काढून घरी उतरवा. ज्या ठिकाणी मांस आणि मद्य सेवन केले जाते अशा ठिकाणी रुद्राक्ष कधीही धारण करू नये. मांसाहार करणाऱ्यांनी रुद्राक्ष धारण करू नये. मान्यतेनुसार, रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने प्रथम धूम्रपान आणि मांसाहार सोडला पाहिजे.
advertisement
स्मशानातून बाहेर पडल्यावर मागे वळून का पाहू नये? गरुड पुराणात सांगितले आहे याचे कारण
धार्मिक मान्यतेनुसार गर्भवती महिलांनी रुद्राक्ष धारण करू नये. जर एखाद्या स्त्रीला रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला देण्यात आला असेल तर, मुलाच्या जन्मानंतर, तिने सुतक कालावधीच्या समाप्तीपर्यंत रुद्राक्ष काढावा.
रुद्राक्ष धारण केल्यास ते झोपताना उतरवावे. तुम्ही झोपताना ते काढून उशीखाली ठेवू शकता. उशीखाली रुद्राक्ष ठेवल्याने वाईट स्वप्ने येणे थांबते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2024 9:23 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Rudraksha: तुम्ही सुद्धा रुद्राक्ष धारण केलंय तर चुकूनही करू नका या चुका नाहीतर संकटाना द्याल आमंत्रण