ram mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची कोणत्या मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठा? संपूर्ण माहिती
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
22 जानेवारीला अयोध्येतल्या नव्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदाचा अतिसूक्ष्म मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
अयोध्या, 26 डिसेंबर : अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य नवीन मंदिर साकारलं जात आहे. मंदिराची सर्व कामं आता अंतिम टप्प्यात आली आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी नवीन मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे. श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी या दिवशी 84 सेकंदाचा अतिसूक्ष्म मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. या शुभमुहूर्तावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरातल्या विद्वान ज्योतिषाचार्यांच्या सल्ल्यानुसार हा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
22 जानेवारीला अयोध्येतल्या नव्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदाचा अतिसूक्ष्म मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तासाठी देशभरातले विद्वान आणि तज्ज्ञ ज्योतिषाचार्यांना वेळ निश्चित करण्यास सांगितलं होतं. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. अयोध्येत या सोहळ्याची वेगाने तयारी सुरू आहे. 22 जानेवारीच्या सोहळ्यापूर्वी अयोध्येतल्या प्रत्येक भागात कडक सुरक्षा व्यवस्था असेल. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. अयोध्येतली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी अयोध्येतल्या प्रत्येक ठिकाणी सीआरपीएफ, यूपीएसएसएफ, पीएससी, सिव्हिल पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यासाठी तंत्रज्ञानाचा वापरदेखील केला जात आहे. या सोहळ्यादरम्यान एआय बेस्ड सीसीटीव्ही कॅमेरातून नजर ठेवली जाईल. अयोध्येत विनापरवानगी ड्रोन उडवण्यास बंदी आहे.
advertisement
श्रीराम मंदिरातल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी काशीचे ज्योतिषाचार्य पंडित गणेश्वरशास्त्री द्रविड यांनी जो मुहूर्त निवडला, तो अचूक मानला गेला आहे. या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या शुभमुहूर्ताचा क्षण हा केवळ 84 सेकंदांचा असेल. तो 12 वाजून 29 मिनिटं 8 सेकंदांपासून 12 वाजून 30 मिनिटं 32 सेकंदांपर्यंत असेल.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक तारखांचे पर्याय दिले होते. यात 17 जानेवारीपासून ते 25 जानेवारीपर्यंत पाच तारखा होत्या; पण काशीचे ज्योतिषाचार्य पंडित गणेश्वरशास्त्री द्रविड यांनी 22 जानेवारीचा मुहूर्त निवडला. या विद्वान ज्योतिषाचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, `हा मुहूर्त अनेक अर्थांनी दोषमुक्त आहे. हा मुहूर्त अग्निबाण, मृत्यूबाण, चोरवाण, नृपवाण आणि रोग बाणापासून मु्क्त आहे.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
Dec 26, 2023 6:16 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
ram mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची कोणत्या मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठा? संपूर्ण माहिती






