Janmashtami 2023: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जन्माष्टमी! 2 शुभ योगात साजरा होणार कृष्ण जन्मोत्सव, पहा पूजेचा शुभ मुहूर्त
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
janmashtami 2023 date: श्रीकृष्णाचे भक्त वर्षभर जन्माष्टमीच्या आगमनाची वाट पाहत असतात. या दिवशी उपवास केला जातो आणि रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.
मुंबई, 15 ऑगस्ट : श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो. मथुरेत जन्मलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रीकृष्णाचे भक्त वर्षभर जन्माष्टमीच्या आगमनाची वाट पाहत असतात. या दिवशी उपवास केला जातो आणि रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट सांगतात की, बाळगोपाळाचा जन्म रात्री झाला होता, तेव्हा रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी होती. यावर्षी रोहिणी नक्षत्र जन्माष्टमी आणि अष्टमी तिथीच्या रात्री आहे. यंदा जन्माष्टमी 2 शुभ योगात साजरी होणार आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. या वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी कधी आहे आणि पूजा मुहूर्त, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
2023 जन्माष्टमी कधी आहे?
2023 मध्ये जन्माष्टमीचा सण बुधवार, 06 सप्टेंबर रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, नीज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 06 सप्टेंबर रोजी दुपारी 03.37 वाजता सुरू होईल. अष्टमी तिथी गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी 04.14 मिनिटांपर्यंत वैध असेल.
जन्माष्टमी 2023?
यावर्षी जन्माष्टमीसाठी रोहिणी नक्षत्र 6 सप्टेंबर रोजी सकाळी 09.20 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10.25 वाजता संपेल. 6 सप्टेंबर रोजी रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी कृष्ण जन्मोत्सवाची रात्र असल्याने त्या दिवशीच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल.
advertisement
जन्माष्टमी 2023 पूजा मुहूर्त कधी आहे?
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 11.57 वाजता सुरू होतो. मध्यरात्री 12.42 पर्यंत बाळ गोपाळाची जयंती व पूजा चालेल. उपासनेसाठी हा शुभ काळ आहे. यावेळी भगवान श्रीकृष्णाचा जन्म होईल आणि उत्सव साजरा केला जाईल.
जन्माष्टमी 2023 मध्ये सर्वार्थ सिद्धीसह 2 शुभ योग -
जन्माष्टमीच्या दिवशी रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. जन्माष्टमीला दिवसभर असणारा सर्वार्थ सिद्धी योग सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. या योगात तुम्ही केलेले शुभ कार्य यशस्वी ठरेल. रवि योग सकाळी 06:01 पासून सुरू होईल आणि सकाळी 09:20 पर्यंत राहील. या योगात सूर्यदेवाची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते.
advertisement
जन्माष्टमी उपवास वेळ 2023
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केला जातो. यावेळी तुम्ही जन्माष्टमीचे पारण रात्री 12.42 नंतर करू शकता. जर दुसर्या दिवशी सूर्योदयानंतर जन्माष्टमी तुमच्या ठिकाणी साजरी होत असेल, तर तुम्ही ती 7 सप्टेंबर रोजी सकाळी 06:02 पासून पारण (उपवास सोडणे) करू शकता.
advertisement
दहीहंडी 2023 कधी आहे?
जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दहीहंडीचा सण साजरा केला जातो. यंदा दहीहंडी उत्सव 7 सप्टेंबर, गुरुवार रोजी साजरा होणार आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो.
श्री कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व -
जन्माष्टमीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यानं भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो. जे लोक निपुत्रिक आहेत किंवा त्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, त्यांनी जन्माष्टमीचे व्रत ठेवावे आणि बाळ-गोपाळाची पूजा करावी, जेणेकरून त्यांची इच्छा पूर्ण होईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2023 9:20 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Janmashtami 2023: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जन्माष्टमी! 2 शुभ योगात साजरा होणार कृष्ण जन्मोत्सव, पहा पूजेचा शुभ मुहूर्त


