तिजोरीत ठेवा फक्त एक पान, पैशांना लागली असेल कोणाची नजर, तर झटक्यात होईल दूर!

Last Updated:

ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय सांगितलेले आहेत, ज्यामुळे आयुष्यातल्या आर्थिक अडचणी मूळापासून नष्ट होतात. असाच एक साधा उपाय पाहूया.

केवळ एका उपायाने आपल्याला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळू शकतो.
केवळ एका उपायाने आपल्याला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळू शकतो.
परमजीत कुमार, प्रतिनिधी
देवघर : आजकाल पैसे कोणाला नको? आपण अत्यंत सुख-सुविधांमध्ये जगावं असं कोणाला नाही वाटत? परंतु अनेकजणांना काही केल्या मनासारखे पैसे मिळत नाहीत, तर अनेकजणांना पैसे मिळतात पण ते तिजोरीत टिकतच नाहीत. त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळत असतानाही ते कायम कर्जत बुडालेले असतात. परिणामी त्यांचं मनही कायम अस्थिर राहतं. या अडचणींवरच आज आपण एक रामबाण उपाय पाहणार आहोत.
advertisement
ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय सांगितलेले आहेत, ज्यामुळे आयुष्यातल्या आर्थिक अडचणी मूळापासून नष्ट होतात. असाच एक साधा उपाय पाहूया. आपल्या स्वयंपाकघरातल्या एका पानानेच आपली आर्थिक चणचण दूर होईल.
झारखंडच्या देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतत आर्थिक अडचणी येणं, हातात पैसे न टिकणं यामागचं मुख्य कारण म्हणजे आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपा नसणं. मात्र घाबरू नका. केवळ एका उपायाने आपल्याला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळू शकतो. एक तेजपत्ता आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर करू शकतो.
advertisement
त्यासाठी आपल्याला एका तेजपत्त्याची पूजा करून तो लक्ष्मीच्या चरणात अर्पण करायचा आहे. त्यानंतर हेच पान लाल कापडात बांधून आपल्या तिजोरीत ठेवावं. यामुळे आपल्याला असंख्य आर्थिक फायदे होतील.
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा केलेला तेजपत्ता देवीच्या चरणात वाहून लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवल्यास आपल्याकडून जास्त खर्चही होणार नाही. शिवाय उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. ज्यामुळे आयुष्यभरासाठी आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल. शिवाय आपल्या धनसंपत्तीला कोणाची नजर लागली असेल, तर त्या नकारात्मक उर्जेपासूही आपल्या संपत्तीचं रक्षण होईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/अध्यात्म/
तिजोरीत ठेवा फक्त एक पान, पैशांना लागली असेल कोणाची नजर, तर झटक्यात होईल दूर!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement