30 वर्षांनी पिता-पुत्र एकत्र; शनी-सूर्याचं मिलन! तुमच्या ओंजळीत मात्र सुख नाही मावणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
शनी कुंभ राशीत आधीपासूनच विराजमान आहे, तर फेब्रुवारी महिन्यात सूर्य याच राशीत प्रवेश करेल. त्यानंतर या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार, पाहूया.
परमजीत कुमार, प्रतिनिधी
देवघर : दोन ग्रहांचं मिलन होणं हा एक अद्भुत योग मानला जातो. आता लवकरच सूर्य आणि शनी ग्रह एकत्र येणार आहेत. कुंभ राशीत त्यांचं मिलन होईल. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं, तर शनीला न्यायदेवता म्हणतात. शिवाय शनीदेवांना सूर्यदेवांचा पुत्रही मानतात. हे दोन्ही ग्रह तब्बल 30 वर्षांनी एकत्र येणार आहेत. अर्थातच याचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. काही राशींसाठी हा परिणाम सकारात्मक असेल, तर काही राशींसाठी नकारात्मक.
advertisement
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी कुंभ राशीत आधीपासूनच विराजमान आहे, तर फेब्रुवारी महिन्यात सूर्य याच राशीत प्रवेश करेल. त्यानंतर या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार, पाहूया.
मेष : सूर्य आणि शनीच्या युतीमुळे आपल्याला प्रचंड सकारात्मक फायदा होईल. नशिबाची इतकी साथ मिळेल की, तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. अचानक धनलाभही होऊ शकतो. थांबलेली सर्व कामं पूर्ण होतील. घरात मंगल कार्य पार पाडण्याची शक्यता आहे.
advertisement
मिथुन : आपल्यावर सूर्य आणि शनीची कृपा असेल. करियर आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. हा प्रवासदेखील आपल्याला लाभदायी ठरेल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळेल.
advertisement
तूळ : शनी आणि सूर्याच्या युतीचा आपल्यालासुद्धा चांगला लाभ मिळेल. कुटुंबातलं वातावरण आनंदाचं असेल. वडिलांच्या मदतीमुळे तुमची सर्व अडलेली कामं पूर्ण होतील. पालकांना मुलांकडून शुभवार्ता मिळतील. आजारपण दूर होईल. व्यवसायात केलेल्या गुंतवणूकीतून चांगला नफा मिळेल. जमीन, मालमत्ता किंवा गाडी खरेदी करायची असल्यास त्यासाठी ही वेळ अनुकूल आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा
Location :
Deoghar,Jharkhand
First Published :
January 20, 2024 7:43 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
30 वर्षांनी पिता-पुत्र एकत्र; शनी-सूर्याचं मिलन! तुमच्या ओंजळीत मात्र सुख नाही मावणार