Makar Sankranti 2024: मकर संक्रातीचं धार्मिक महत्त्व सांगणाऱ्या या गोष्टी अनेकांना माहीत नाहीत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Makar Sankranti 2024: मकर ही एक राशी आहे आणि सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात. या सणाला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकरसंक्राती हे नाव देण्यात आलं आहे.
मुंबई, 09 जानेवारी : मकर संक्राती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी फक्त तिळापासून बनवलेले पदार्थ खाणे, पतंग उडवणे, तिळगुळ वाटणे इतकाच त्याचा अर्थ नाही. सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याव्यतिरिक्त आरोग्य आणि सामान्य राहणीमानाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये बदल घडतात, मकर संक्राती हा सण श्रद्धेचा केंद्रबिंदू तर आहेच. शिवाय सुगीचा हंगाम असल्यानं शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टी या सणाशी जोडल्या गेल्या आहेत.
मकर संक्रांतीशी संबंधित अशा 7 गोष्टी आहेत, ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील. ज्यामुळे या सणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व सिद्ध होते. नावाचं महत्त्व - मकर ही एक राशी आहे आणि सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात. या सणाला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकरसंक्राती हे नाव देण्यात आलं आहे.
advertisement
दरवर्षी एकच तारीख - दरवर्षी एकाच तारखेला येणारा हा एकमेव सण आहे. प्रत्यक्षात हे सौर दिनदर्शिकेनुसार होतं. इतर सण चंद्राच्या कॅलेंडर (चंद्राचे स्थान)च्या आधारावर मोजले जातात. हे चक्र दर आठ वर्षांनी एकदा बदलते आणि त्यानंतर एक दिवस हा उत्सव साजरा केला जातो. 2050 पासून दर आठ वर्षांनी 15 जानेवारी आणि त्यानंतर 16 जानेवारीला हा सण साजरा केला जाईल, अशी गणना अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. यावेळी 2024 मध्येही मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जात आहे.
advertisement
तीळ आणि गुळाचे महत्व काय?
मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू बनवण्याची परंपरा आहे. भूतकाळातील कटू गोष्टी विसरून नवीन गोड सुरुवात करण्याची परंपरा यामागे आहे. वैज्ञानिक आधारावर बोलायचे झाले तर तिळाचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते आणि यातील तेलामुळे शरीराला भरपूर आर्द्रताही मिळते. एक सण, अनेक नावे भारताबरोबरच दक्षिण आशियातील इतर अनेक देशांमध्येही मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा केला जातो. देशाच्या बहुतांश भागात याला मकर संक्रांत म्हणतात. तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, पंजाबमध्ये माघी, आसाममध्ये बिहू आणि उत्तर प्रदेशमध्ये खिचडी म्हणतात. नेपाळ, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका आदी देशातही मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा करतात.
advertisement
पतंग का उडवले जातात
मकर संक्रांतीचा सण आरोग्यासाठीही अनेक अर्थाने फायदेशीर आहे. सकाळी पतंग उडवण्याच्या बहाण्याने शरीराला जो सूर्यप्रकाश मिळतो, त्यातून ‘ड’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात मिळते. हे त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते आणि थंडीच्या हवामानात होणार्या अनेक समस्या दूर करण्यातही ते उपयुक्त आहे.
advertisement
तीर्थयात्रेची सुरुवात दर्शवते - देशाच्या अनेक भागात मकर संक्रांतीपासून तीर्थयात्रा सुरू होतात. उत्तर प्रदेश आणि केरळमधील सबरीमाला येथे कुंभमेळ्याची सुरुवात होते. या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील करतात. असे केल्याने सर्व पापे धुतली जातात, असे मानले आहे.
दिवस आणि रात्र समान - शास्त्रीयदृष्ट्या पाहायला गेल्यास मकरसंक्रातीनंतर हिवाळा ऋतू कमी होण्याचे सूचक आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी दिवस आणि रात्र समान कालावधीची असल्याचे मानली जाते. यानंतर, दिवस मोठे होऊ लागतात आणि हवामान अधिक गरम होते. यानंतर काढणी किंवा वसंत ऋतुचे आगमन मानले जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2024 9:10 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti 2024: मकर संक्रातीचं धार्मिक महत्त्व सांगणाऱ्या या गोष्टी अनेकांना माहीत नाहीत








