Spiritual : हिंदू धर्मातील एक आगळीवेगळी परंपरा! महादेवाच्या मंदिरात पाया पडताना तीन टाळ्या का वाजवतात? Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Spiritual Significance : भगवान शंकराच्या मंदिरात पाया पडताना तीन टाळ्या वाजवण्याची प्रथा आहे.पण तुम्हाला या प्रथेबद्दल माहिती आहे का? चला तर जाणून घेऊयात या विषयी काही माहिती.
पवित्राचा श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना म्हटलं की आपण सर्वजण भगवान शंकरांचे आराधना करतो. श्रावण महिन्यात आणि इतरही दिवशी आपण भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी जेव्हा मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपण सर्वजण लिंगाचे दर्शन घेतो त्याच्यानंतर तीन वेळा टाळ्या वाजवतो. पण तीन वेळा टाळ्या वाजवण्याचं काय महत्त्व आहे. यामागे कोणती पौराणिक कथा आहे आणि हे वाजवल्या नंतर काय होतं. याविषयीच आपल्याला माहिती सांगितलेली आहे संभाजीनगर शहरातील गुरुजी सतीशजी जोशी यांनी.
भगवान शंकराच्या मंदिरात आपण जेव्हा दर्शन घेण्यासाठी जातो त्यावेळेस जेव्हा आपण शिवलिंगाचे दर्शन घेतो दर्शन घेताना आपण तीन वेळेस टाळ्या वाजवतो ते याकरिता की शिव पुराना मध्ये यासाठी वेगवेगळ्या कथा सांगितलेले आहेत त्या अशा या तीन टाळ्या म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यातील देवांच्या टाळ्या असतात. आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात जातो आणि मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकरांना कळावं की आपण मंदिरामध्ये आलो आहोत त्यांच्या दर्शनाकरता.
advertisement
या तीन टाळ्या वाजवल्या जातात. कारण की भगवान शंकर हे रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन असतात आणि त्यांना माहिती व्हावे की आपण दर्शन घेण्यासाठी आले आहोत याकरिता या टाळ्या वाजवून त्यांना माहिती करून देत असतो. असं गुरुजींनी सांगितला आहे.
हे झालं आध्यात्मिक कारण पण यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे, त्यासाठी तीन टाळ्या वाजवल्यामुळे आपलं रक्ताभिसरण देखील यामुळे चांगलं होतं. त्यासोबतच भगवान शंकरांचे दर्शन घेताना आपण आपल्या हाताची लिंग मुद्रा देखील करावी. हे केल्यामुळे देखील महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात असं सांगितलं आहे. तसेच तुम्ही दर्शन घेताना शंख मुद्रा देखील करून दर्शन घ्यावं. असे गुरुजींनी सांगितलेले आहे. तर यामुळे मंदिरात गेल्यानंतर या तीन टाळ्या वाजवतात आणि ह्या जर तुम्ही मुद्रा केल्या तर तुमच्यावरती भगवान शंकराची ग्रुप आहे राहील असं गुरुजींनी सांगितलेले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 11, 2025 2:43 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Spiritual : हिंदू धर्मातील एक आगळीवेगळी परंपरा! महादेवाच्या मंदिरात पाया पडताना तीन टाळ्या का वाजवतात? Video







