महाशिवरात्रीला उपवास मोडण्याची भीती वाटते, या 4 ट्रिक्स वापरा अन् बिनधास्त राहा
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उपवास धरताय पण लक्षात राहत नाही? तर त्यासाठी काही बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्या कोणत्या? जाणून घ्या
अमरावती : वर्षभरात अनेक उपवास येतात. त्यातील आषाढ एकादशी, कार्तिक एकादशी आणि महाशिवरात्री हे उपवास जास्तीत जास्त प्रमाणात केले जातात. काही लोकं नेहमी उपवास करत असल्याने त्यांना सवय होऊन जाते. त्यामुळे त्यांच्या लक्षात राहते की, आज उपवास आहे म्हणून फक्त उपवासाचे पदार्थ खायचे.
पण, काही असे सुद्धा असतात जे वर्षभरात एकदाच उपवास करतात. त्यामुळे त्यांना लक्षात राहत नाही आणि ते दिवसभरातून कित्येकदा उपवास मोडतात. उपवास जर चुकीने मोडला असेल तर काही होत नाही असे म्हटले जाते. पण जर उपवास मोडणारच नाही याची काळजी घेतली तर अधिक बरे होईल. अशा व्यक्तींसाठी काही ट्रिक्स आहेत. ज्यामुळे तुमचा महाशिवरात्री उपवास मोडणार नाही. त्या कोणत्या ते जाणून घेऊ.
advertisement
उपवास मोडणार नाही ही काळजी कशी घ्यायची?
1. तुम्ही जर उपवास धरला असेल तर सर्वात आधी तुम्हाला मन एकाग्र ठेवावे लागेल. ज्यामुळे तुम्ही विसरणार नाही की तुम्ही उपवास धरलाय. त्यासाठी एखादे पुस्तक किंवा ग्रंथाचे वाचन तुम्ही करू शकता.
advertisement
2. उपवास धरलाय हे आठवण ठेवण्यासाठी दुसरे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी वावरता त्याठिकाणी चिठ्ठी चिटकवून ठेवू शकता. किंवा कशावर तरी नोंद करून ठेऊ शकता.
3. मोबाईलवर अलार्म सेट करून सुद्धा आठवण ठेऊ शकता. त्याचबरोबर स्वतःला कामात व्यस्त ठेवा, ज्यामुळे तुमचे मन खाण्याकडे किंवा इतर कोणत्याही उपवास मोडेल अशा गोष्टीकडे जाणार नाही.
advertisement
4. तुमच्या मनाची परिपूर्ण तयारी असेल तर तुम्हाला उपवास करणे सोपे जाईल. त्यामुळे मनाची तयारी करून तुम्हाला आवडत असणारे एखादे काम करत बसा, म्हणजे तुमचा उपवास मोडणार नाही.
उपवास धरल्यानंतर मन जर एकाग्र असेल तर उपवास धरलाय हे विसरत नाही. त्यामुळे मन एकाग्र ठेवून आपण उपवास का धरलाय हे लक्षात घेऊन त्यादिवशी दिवसभर कृती करावी, असे केल्यास तुमचा उपवास मोडणार नाही.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Feb 25, 2025 9:33 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
महाशिवरात्रीला उपवास मोडण्याची भीती वाटते, या 4 ट्रिक्स वापरा अन् बिनधास्त राहा









