शिव मंदिरातून परतताना 90% लोक करतात 'ही' चूक, शिवपुराणातील 'हा' नियम मोडणं पडू शकत महागात!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन जल अर्पण करणे ही एक अत्यंत प्राचीन आणि श्रद्धापूर्ण परंपरा आहे. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि शिवपुराणानुसार, अनेक भाविक नकळत एक मोठी चूक करतात, ज्यामुळे त्यांच्या पूजेचे पूर्ण फळ त्यांना मिळत नाही.
Avoid This Mistake While Returning From Shiv Mandir : भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन जल अर्पण करणे ही एक अत्यंत प्राचीन आणि श्रद्धापूर्ण परंपरा आहे. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि शिवपुराणानुसार, अनेक भाविक नकळत एक मोठी चूक करतात, ज्यामुळे त्यांच्या पूजेचे पूर्ण फळ त्यांना मिळत नाही. ही चूक म्हणजे मंदिरातून रिकाम्या हाताने किंवा रिकाम्या तांब्यासह परत येणे.
99 टक्के लोक करतात 'ही' चूक
अनेकांना अशी सवय असते की, घरातून तांब्याच्या लोट्यात पाणी भरून न्यायचे आणि शिवलिंगावर सर्व जल अर्पण केल्यानंतर तो रिकामा लोटा तसाच घरी घेऊन यायचे. शास्त्रांनुसार, मंदिरातून रिकामा लोटा परत आणणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की रिकामा लोटा हा रिकाम्या नशिबाचे किंवा अपूर्ण संकल्पाचे प्रतीक आहे. यामुळे आर्थिक चणचण भासू शकते.
advertisement
लोट्यात थोडे जल शिल्लक ठेवा
जेव्हा तुम्ही शिवलिंगावर जलाभिषेक करता, तेव्हा लोट्यातील संपूर्ण जल अर्पण न करता अगदी थोडे जल लोट्यात राखून ठेवावे. हे जल साधे नसून महादेवाच्या स्पर्शाने 'चरणामृत' किंवा अत्यंत ऊर्जावान तीर्थ बनलेले असते. हे पवित्र जल लोट्यात ठेवूनच घरी परतणे योग्य मानले जाते.
सकारात्मक ऊर्जेचा संचार
मंदिरातून परतताना लोट्यात जे थोडे जल शिल्लक असते, ते घरी आल्यावर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि सर्व खोल्यांमध्ये शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. जर तुम्ही रिकामा लोटा आणला, तर तुम्ही मंदिरातील ती सकारात्मक ऊर्जा घरी आणण्याची संधी गमावता.
advertisement
अक्षता किंवा फुलांचा वापर
जर चुकून लोट्यातील सर्व जल शिवलिंगावर अर्पण झाले असेल, तर लोटा रिकामा आणण्याऐवजी त्यात मंदिरातील एखादे फूल, अक्षता किंवा प्रसादाचा छोटा भाग ठेवावा. रिकाम्या हाताने किंवा रिकाम्या भांड्याने मंदिराबाहेर पडणे हे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करणारे ठरू शकते, असे वास्तू तज्ज्ञ सांगतात.
घरातून जल नेण्याचे महत्त्व
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेक लोक रिकाम्या लोट्यासह मंदिरात जातात आणि तिथे असलेल्या नळाचे पाणी वापरतात. मात्र, नियमांनुसार आपल्या घरातील जल घेऊन मंदिरात जावे. यामुळे आपल्या घरातील दोष दूर होतात आणि घराची ऊर्जा शुद्ध होते. रिकामा लोटा घेऊन मंदिरात जाणे देखील आर्थिक स्थितीसाठी चांगले मानले जात नाही.
advertisement
मंदिरातून परततानाच्या इतर चुका
घंटा वाजवणे: मंदिरात शिरताना घंटा वाजवावी, पण दर्शन घेऊन परतताना कधीही घंटा वाजवू नये.
पाय धुणे: मंदिरातून आल्यावर लगेच पाय धुवू नयेत. मंदिरातील पवित्र ऊर्जा शरीरात स्थिर होण्यासाठी काही वेळ थांबणे आवश्यक आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 6:03 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
शिव मंदिरातून परतताना 90% लोक करतात 'ही' चूक, शिवपुराणातील 'हा' नियम मोडणं पडू शकत महागात!






