नवरात्रीमध्ये का करतात कन्या पूजन ? काय आहे पौराणिक महत्त्व?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नवरात्रीमध्ये कन्या पूजन करण्याचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का ?
डोंबिवली 29 सप्टेंबर : गणेशोत्सव सरला असून पुढील पंधरा दिवसात नवरात्र उत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. नवरात्र उत्सवात देखील अनेक प्रथा परंपरा जपल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने कन्या पुजन केले जाते. कन्या पूजन का करतात ? याची अनेकांना माहिती नसते. डोंबिवलीतल्या प्रवचनकार अलका मुतालिक यांनी कन्या पूजन करण्यामागचं कारण आणि परंपरा सांगितली आहे.
शक्ती आणि ज्ञानाचे जागरण करणारा उत्सव म्हणजेच नवरात्र उत्सव. या उत्सवात प्रामुख्याने देवीची उपासना केली जाते. ही आदिशक्ती परब्रह्म किंवा परमात्म्याची शक्ती आहे. ही शक्ती अखंड कुमारिका मानली जाते. ज्यावेळी समाजात अपप्रवृत्ती वाढीस लागली त्यावेळी या अपप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी देवीने कुमारिकेचे रूप घेतलं आहे, अशी माहिती मुतालिक यांनी दिली.
advertisement
काय आहे पौराणिक कथा?
अलका मुतालिक यांनी याबाबतची एक पौराणिक कथा देखील सांगितली. कालासुर नावाचा एक राक्षस होता. तो सर्वांना प्रचंड त्रास देत असे. दुर्गा देवीनं बालिकेचे रूप घेऊन त्याचा नायनाट केला. त्यामुळे त्यावेळी ती योगिनी म्हणून प्रगट झाली. त्यावेळी ती गृहस्थ आश्रम सांभाळणारी गृहिणी नव्हती. त्यामुळे ज्यावेळी या देवीने बालिकेचे रूप घेतले त्यावेळी तीने तिची सर्व इंद्रिय समाजाच्या उद्धारासाठी वापरली.
advertisement
नवरात्रीच्या नऊ देविंचा उल्लेख केला जातो ती स्कंद माता, काली माता ब्रमचारिणी माता , शैलपुत्री माता या सर्वच देवी कुमारिका स्वरूपाच्या आहेत. लहान मुलीमध्ये निरागसता आणि माया असते. ही माया आणि निरागसता आपल्यात यावी. आपल्या ज्ञानाची दारे या मुलींच्या रुपात कायम खुली राहावी हा यामागचा उद्देश आहे, अशी माहिती अलका मुतालिक यांनी दिली.
advertisement
आपले सर्व उत्सव पंचमहाभूतांवर आधारित आहेत. संपूर्ण विश्व पंचमहाभूतांवर आधारित आहेत. आपण सर्वचजण पंचमहाभूतानी बनलेले आहोत.त्यामुळे हे उत्सव पंचमहाभूतांप्रमाणे साजरे केले जातात.
गंगादशेरा या सणातून जलतत्वाचे पूजन केले जाते. गणेशाचे पार्थिव पूजन करणे हे पृथ्वी तत्वाचे पूजन आहे. पितृ पंधरवडा म्हणजेच वायू तत्व स्वरूप असल्याने वायूचे पूजन केले जाते. नवरात्र उत्सव शक्तीचे पूजन आहे आणि दिवाळीचे पूजन हे आकाशाचे किंवा ज्ञानाचे पूजन आहे असं वेदांमध्ये सांगितल्याची माहिती मुतालिक यांनी दिली.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
September 29, 2023 12:30 PM IST