Navratri 2025: लोकांना आजारातून मुक्त करणारी देवी, नागपूरमधील अनुसया माता मंदिराची अशीही आख्यायिका

Last Updated:

सती अनुसया माता समाधी मंदिर हे श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. नवरात्रीत या ठिकाणी भक्तिमय वातावरणाची अविस्मरणीय अनुभूती मिळते. 

+
News18

News18

अमरावती: नवरात्रीचा पावन सोहळा सुरू होताच विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील पारडशिंगा या गावात लाखो भाविकांची गर्दी उसळते. तेथील सती अनुसया माता समाधी मंदिर हे श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. नवरात्रीत या ठिकाणी भक्तिमय वातावरणाची अविस्मरणीय अनुभूती मिळते. नागपूरपासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर आणि अमरावतीपासून वरुड मार्गे 132 किलोमीटरवर असलेले पारडशिंगा हे गाव निसर्गरम्य वातावरणामुळे प्रसिद्ध आहे. ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतच भक्ते कुटुंबात जन्मलेल्या सती अनुसया मातेचे जीवन चमत्कारांनी भरलेले होते, असं तेथील नागरिक सांगतात. त्यांच्याच समाधी मंदिरात आता भक्तांची गर्दी होते. या मंदिराबाबत माहिती तेथील गावकऱ्यांनी दिली आहे.
भक्ते कुटुंबात जन्मलेली सती अनुसया माता
गावकरी सांगतात की, त्यांचे वडील रामजी भक्ते पाटील आणि आई अनायी या दाम्पत्याच्या पोटी माता जन्मल्या. उमरी गावातील जंगलुजी खंदाईत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मात्र, संसारिक जीवनापेक्षा त्यांनी अध्यात्माचा मार्ग पत्करला. काळानुसार त्यांचे दिव्य लीला कार्य लोकांसमोर प्रकट होऊ लागले आणि त्यांनी सांसारिक बंधनातून स्वतःची मुक्तता करून घेतली. भ्रमंती करताना मातेने मिळेल ते खाल्ले, भिक्षा मागून आपले जीवन व्यतीत केले. त्या काळात काहींनी त्यांना वेडसर समजून घराबाहेरही काढले. तरीही त्यांनी भक्तांना अनेक चमत्कार दाखविले. मेलेले कुत्रे जिवंत करणे, आंधळ्यांना दृष्टी परत मिळवून देणे, आजारी व्यक्तींना बरे करणे अशा अनेक लीला त्यांनी प्रकट केल्या, असंही ते सांगतात.
advertisement
मातेचे आकर्षक असे समाधी मंदिर
काही काळ आजारी राहिल्यानंतर 10 जानेवारी 1997 रोजी मातेने देह सोडला. त्यांचे समाधी मंदिर पारडशिंगा या गावात उभारण्यात आले असून ते आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे ध्यान मंदिरात मातेच्या सर्व लीला कार्यांचे फोटो लावलेले असून, भक्तांना त्या स्मरणातून अध्यात्मिक शांतीचा अनुभव येतो. नवरात्रीत या समाधी मंदिराची भव्य सजावट केली जाते.
advertisement
निसर्गरम्य वातावरणात असलेलं मंदिर
सती अनुसया माता मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते समाधी मंदिरापर्यंत वेलींचा मंडप उभारला आहे. तो नेहमीसाठी असतो. त्यामुळे भक्तांना निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येतो. त्यातून जाताना भक्तांना निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घेता येतो. तसेच मंदिर परिसरात आकर्षक गार्डन आहे. भक्तांसाठी भोजन, निवास, विश्रांती आदींची सर्व सोय मंदिर व्यवस्थापनाकडून केली जाते. विशेष म्हणजे येथील कच्चा चिवडा विशेष लोकप्रिय आहे. विविध बचत गटाच्या महिलांनी त्याठिकाणी व्यवसाय सुरू केले आहे.
advertisement
नवरात्रीच्या काळात पारडशिंगा गाव उत्साह, भक्ती आणि आध्यात्मिक उर्जेने नटून जाते. दूरदूरहून येणारे भाविक येथे सती अनुसया मातेच्या समाधीवर माथा टेकवत आपले कष्ट हलके करतात, अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Navratri 2025: लोकांना आजारातून मुक्त करणारी देवी, नागपूरमधील अनुसया माता मंदिराची अशीही आख्यायिका
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement