Surya Grahan 2024: पहिलं सूर्यग्रहण कोणत्या अमावस्येला लागणार? कुठे दिसणार, सुतक कालावधी कधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Grahan 2024: सूर्यदेव ही कलियुगात दिसणारी प्रत्यक्ष देवता मानली जाते. ग्रहण होते तेव्हा त्याचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो.
मुंबई, 31 जानेवारी : 2024 सालातील पहिले सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्येला होणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहण राहू आणि केतूमुळे होते आणि ते नेहमी अमावस्येला होते. राहू आणि केतू सूर्याला गिळण्यासाठी येतात, त्यामुळे सूर्यग्रहण होते. त्यामागील पौराणिक कथा समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृताच्या सेवनाशी संबंधित आहे. सूर्यदेव ही कलियुगात दिसणारी प्रत्यक्ष देवता मानली जाते. ग्रहण होते तेव्हा त्याचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो. सूर्यग्रहणाच्या सुतक काळात कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत. पुरी येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊया, यंदा सूर्यग्रहण कधी होईल? सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी कधी असेल? 2024 सालाचे पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार आहे.
कधी आहे पहिले सूर्यग्रहण 2024?
ज्योतिषी मिश्रा यांच्या मते, 2024 सालातील पहिले सूर्यग्रहण फाल्गुन अमावस्या तिथीला सोमवारी, 8 एप्रिल रोजी होणार आहे. फाल्गुन अमावस्या तिथी 08 एप्रिल रोजी सकाळी 03:21 ते रात्री 11:50 पर्यंत आहे. दुसऱ्या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे.
सूर्यग्रहणाचा कालावधी किती आहे?
08 एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण रात्री 09:12 वाजता सुरू होईल आणि सकाळी 1:25 वाजता संपेल. सुतक कालावधी ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होईल आणि ते ग्रहण संपल्यानंतर संपेल.
advertisement
भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही? 
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये होते, तेव्हाच त्याचा सुतक कालावधी वैध असतो. आपल्या क्षेत्रात किंवा देशात सूर्यग्रहण होत नसेल तर सुतक कालावधी पाळला जात नाही. 8 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ पाळला जाणार नाही.
advertisement
वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे दिसणार?
वर्षातील पहिले सूर्यग्रहण अमेरिकेत पूर्णपणे दिसणार आहे. हे सूर्यग्रहण अमेरिकेच्या 13 राज्यांमध्ये पाहता येणार आहे, त्याशिवाय कॅनडा आणि मेक्सिकोमध्येही हे सूर्यग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, इंग्लंड आणि आयर्लंडच्या उत्तर पश्चिम भागात दिसणार आहे.
advertisement
सूर्यग्रहण काळात काय करावे -
जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी स्थिर राहून तुमच्या प्रिय देवतेचे ध्यान करावे. देवतेचे स्मरण किंवा कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. सूर्यग्रहण संपल्यावर घर स्वच्छ करावे. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. गहू, गूळ इत्यादींचे दान करावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 31, 2024 1:50 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Surya Grahan 2024: पहिलं सूर्यग्रहण कोणत्या अमावस्येला लागणार? कुठे दिसणार, सुतक कालावधी कधी


