लखनऊच्या अद्भुत हनुमान मंदिराचे रहस्य, जिथे नवाबही लावायचे हजेरी
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
या मंदिराची प्रदक्षिणा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
मुंबई, 27 ऑगस्ट: उत्तर प्रदेशातील लखनऊ तेथील सुसंस्कृतपणा, ऐतिहासिक मंदिरे, इमारती आणि पाककृतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. लखनऊच्या अलीगंजमध्ये एक अतिशय प्राचीन हनुमान मंदिर आहे, ज्याचा इतिहास रामायण काळाशी संबंधित आहे. याविषयी असे म्हणतात की जेव्हा लक्ष्मणजी माता सीतेला वनवासात सोडून जात होते, तेव्हा संध्याकाळ झाल्यामुळे सीताजींनी येथे विश्रांती घेतली होती. लक्ष्मणजी लक्ष्मणटिला येथे गेले होते, तर हनुमानजी सीता मातेच्या रक्षणासाठी येथे उपस्थित होते. तेव्हापासून ते सिद्धपीठ म्हणून ओळखले जाऊ लागले. अवधचे शेवटचे नवाब वाजिद अली शाह हेदेखील या ठिकाणच्या आध्यात्मिक वैभवाने इतके प्रभावित झाले होते की ते आपल्या पत्नीसह या मंदिरात येत असत आणि येथे भंडारा करत असत.
लक्ष्मीप्राप्तीसाठी करा गुलाबाचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी
यासोबतच ते वानरांना हरभरे खायला घालायचे. लखनऊचे इतिहासकार दिवंगत डॉ. योगेश प्रवीण यांनी आपल्या लखनऊनामा या पुस्तकात या मंदिराचा उल्लेख केला आहे. नवाब वाजिद अली शाह या ठिकाणाचे वैभव पाहून प्रभावित झाले होते. त्यांनी या मंदिराचे सुशोभीकरण करून या मंदिरावर चांद लावला होता, जो आजही मंदिराच्या शिखरावर आहे, असा उल्लेख आहे.
advertisement
एवढेच नव्हे तर नवाब वाजिद अली शाह यांच्या बेगम यांनी बडे मंगल येथून भंडारा सुरू केला होता, जो दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या मंदिरात बजरंगबलीचे मुख उत्तरेकडे आहे. येथे दररोज शेकडो भाविक येतात. या मंदिराची प्रदक्षिणा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
1783 मध्ये बांधले होते मंदिर
या मंदिराचे महंत गोपालदास यांनी सांगितले की, हे मंदिर 1783 मध्ये बांधले गेले. ही देवता स्वयंभू आहे. येथे हनुमानजी बसलेले आहेत. एवढेच नाही तर बांधकाम सुरू असताना हनुमानजींनी येथील एका महंताला दर्शन दिले होते, तेव्हापासून ते सिद्धपीठ मानले जाते. भक्त विजय कुमार यांनी सांगितले की ते अनेक वर्षांपासून येथे येत आहेत आणि भगवान त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
advertisement
मंदिर बंद करण्याची आणि उघडण्याची वेळ
हे मंदिर पहाटे 5:00 वाजता उघडते. दुपारी 12:00 वाजता बंद होते. नंतर संध्याकाळी 4:00 वाजता उघडते आणि रात्री 10:00 वाजता बंद होते. येथे आरती सकाळी 9.00 वाजता होते आणि रात्री 9.00 वाजता होते. हनुमानजी व्यतिरिक्त, प्रभु श्रीराम आणि सरस्वती मातेच्याही येथे मूर्ती आहेत. येथे ज्येष्ठ महंतांचा पुतळाही आहे. याशिवाय साईबाबा आणि नीम करोली बाबाही येथे विराजमान आहेत.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2023 12:01 PM IST