Shravan 2025: श्रावणात पहिल्याच दिवशी महादेवाची पूजा कशी करावी? जाणून घ्या सोपी पद्धत आणि मंत्र!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
श्रावण महिना भगवान शिवाला अत्यंत प्रिय असून, या महिन्यात शिवपूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. श्रावणाच्या पहिल्या दिवशी...
Shravan 2025: श्रावण महिना सुरू होताच सर्वत्र भोलेनाथांच्या जयघोषाचा नाद ऐकू येऊ लागतो. हा महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो. श्रावणाच्या पहिल्या दिवसापासूनच शिवभक्त उपवास, पूजा आणि रुद्राभिषेक यांसारखे विधी सुरू करतात. असे म्हणतात की या पवित्र महिन्यात शिवाची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. म्हणूनच लोक मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने शिवलिंगावर जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि 'ॐ नमः शिवाय' चा जप करतात.
ज्योतिषी रवी पराशर यांच्या मते, श्रावणाच्या पहिल्या दिवशी जर खऱ्या मनाने शिवाची पूजा केली, तर भगवान शंकरांचा आशीर्वाद वर्षभर टिकून राहतो. या काळात भोलेनाथांना प्रसन्न करणे खूप सोपे असते, कारण ते फक्त पाण्यानेही प्रसन्न होतात. फक्त पूजा करताना योग्य पद्धत आणि मंत्र लक्षात ठेवा, जेणेकरून पूजा यशस्वी होईल आणि शिवाची विशेष कृपा प्राप्त होईल.
advertisement
शिवपूजेसाठी आवश्यक साहित्य
- शुद्ध पाणी किंवा गंगाजल
- दूध, दही, तूप, मध आणि साखर (पंचामृतासाठी)
- बेलपत्र, धोत्रा, आघाड्याची फुले
- तांदूळ, रोळी, मौली (पवित्र धागा), फळे, फुले
- दिवा, अगरबत्ती, कापूर
- धूप, चंदन
- नारळ आणि मिठाई
शिवपूजेची सोपी पद्धत
- सर्वात आधी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा.
- पूजा स्थान गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने शुद्ध करा.
- प्रथम शिवलिंगाला शुद्ध पाणी किंवा गंगाजलाने स्नान घाला.
- आता पंचामृताने (दूध, दही, तूप, मध, साखर) अभिषेक करा.
- शिवलिंगाला पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवा.
- आता बेलपत्र, धोत्रा आणि आघाड्याची फुले अर्पण करा.
- चंदनाचा टिळा लावा, अगरबत्ती लावा.
- मिठाई किंवा फळे अर्पण करा.
- 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा 108 वेळा जप करा.
- शेवटी आरती करा आणि कुटुंबाच्या सुखासाठी देवाला प्रार्थना करा.
advertisement
शिवपूजेचे विशेष मंत्र
ॐ नमः शिवाय.
महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बंधनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
या गोष्टी लक्षात ठेवा
- शिवपूजेत तुळशीच्या पानांचा वापर कधीही करू नका.
- पूजेदरम्यान स्वच्छता आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष द्या.
- बेलपत्राला तीन पाने असणे आवश्यक आहे, तुटलेली पाने अर्पण करू नका.
- पूजेनंतर गरजूंना अन्न किंवा वस्त्र दान करण्याचा प्रयत्न करा.
advertisement
श्रावणाचा पहिला दिवस भगवान शंकरांच्या पूजेसाठी एक उत्तम संधी आहे. या दिवशी श्रद्धेने शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र अर्पण केल्यास सर्व संकटे दूर होतात. तसेच, कुटुंबात सुख-शांती टिकून राहते. म्हणून, या श्रावणात सोप्या पद्धतीने भोलेनाथांची पूजा करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा.
हे ही वाचा : Shravan 2025: श्रावण महिन्यात जन्म झालेल्या लोकांमध्ये या गोष्टी खास; महादेवाची कृपा असल्यानं...
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 11, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shravan 2025: श्रावणात पहिल्याच दिवशी महादेवाची पूजा कशी करावी? जाणून घ्या सोपी पद्धत आणि मंत्र!










