Hanuman Temple : महाराष्ट्रातलं असं मंदिर, बाल हनुमानाचं वर्षातून अडीच दिवस दर्शन, 263 वर्षांची आहे परंपरा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
नागपूरमधील नरखेड तालुक्यात बेलोना गावात दर वर्षी मार्गशिष महिन्यात अडीच दिवस बाल हनुमानाची रथयात्रा असते. ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
नागपूर : नागपूरमधील नरखेड तालुक्यात बेलोना गावात दर वर्षी मार्गशिष महिन्यात अडीच दिवस बाल हनुमानाची रथयात्रा असते. ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी 3 ते 4 लाख लोक या तीन दिवसांमध्ये येऊन जातात. 263 वर्षांपासून परंपरा सुरू आहे. नवसाला पावणारा बाल हनुमानजी म्हणून येथील ख्याती आहे, असे तेथील पुजारी सांगतात. यावर्षी 3 ते 5 डिसेंबर दरम्यान ही यात्रा असणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन कसे असणार याबाबत माहिती जाणून घेऊ.
वर्षातून अडीच दिवस भक्तांना दर्शन
श्री बजरंगबली रथयात्रा उत्सव ट्रस्ट बेलोनाचे अध्यक्ष प्रदीप जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पूर्वजांना ही बाल हनुमानाची मूर्ती जमिनीतून मिळाली आहे. जवळपास आता 263 वर्ष याला झाले असावेत. दरवर्षी बेलोना या गावात रथोत्सव साजरा केला जातो. ही यात्रा अडीच दिवसांची असते. यासाठी विविध भागांत याठिकाणी 2.5 ते 3 लाख लोकं दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर विशेष म्हणजे येथील बाल हनुमानाची मूर्ती ही फक्त अडीच दिवसच भक्तांना दर्शनासाठी असते. इतर दिवस त्या मूर्तीला बंदिस्त ठेवण्यात येते. कोणालाही दर्शन दिल्या जात नाही असेही येथील नागरिक सांगतात.
advertisement
असं असणार रथ यात्रेच नियोजन
यावर्षी ही रथ यात्रा 3 ते 5 डिसेंबर दरम्यान असणार आहे. 3 तारखेला सकाळी 5.30 वाजता हनुमंताचे आगमन होणार आहे. त्यांनतर यज्ञ, पूजा आणि बरेच कार्यक्रम रात्रीपर्यंत आहेत. त्यांनतर रात्री 8 वाजता महाआरती असणार आहे. लगेच रथयात्रा सुरू होईल. 4 तारखेला दिवसभर रथ दर्शनासाठी उभा असणार आहे. दिवसभर विविध कार्यक्रम आहेत. 5 तारखेला सकाळी 5 वाजता महापूजा असणार आहे. तसेच 10 वाजता भव्य मिरवणूक सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी 5 वाजता मोठा हनुमंत आणि रथातील हनुमंताची नजर एक करून महाआरती असणार आहे. रात्री 9 वाजता हनुमंताचा निरोप घेणार आहोत. अशाप्रकारे यावर्षी हे नियोजन असणार आहे.
advertisement
मार्गशिष महिन्यात रथयात्रा घेण्याचे कारण की, जेव्हा खोदकाम केले तेव्हा मार्गशिष महिन्यातील दत्ताचे नवरात्र सुरू होते. त्यामुळे पूर्वजांनी हे रथयात्रेचे नियोजन केले होते. ते आताही पार पाडत आहे.
अडीच दिवसांचे नियोजन दरवर्षी सारखेच
view commentsचतुर्दशी, पौर्णिमा आणि प्रतिपदा या तीन विभागामध्ये त्याचे नियोजन झाले आहे. चतुर्दशीला रात्रीला रथ निघतो सकाळी हनुमानजी मंदिरात असतात. संध्याकाळी रथावर असतात, त्यानंतर मिरवणूक असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा रथ पूर्ण दिवस मंदिराजवळ असतो. नवस केलेलं लोकं आणि इतर भक्त येथे दर्शनासाठी येतात. दिवसभर दर्शन सुरू असते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा मिरवणूक काढली जाते. कृष्ण मंदिर आणि राम मंदिर येथे गोपाळकाला होतो. त्यानंतर मंदिरातील मारोती आणि रथातील मारोती यांची भेट होते. त्यानंतर आरती करून यात्रेचा समारोप केला जातो. या तीन दिवस बेलोना गावात जणू दिवाळीचं असते, असे अध्यक्ष प्रदिप जोशी यांनी सांगितले.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
December 02, 2025 4:02 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Hanuman Temple : महाराष्ट्रातलं असं मंदिर, बाल हनुमानाचं वर्षातून अडीच दिवस दर्शन, 263 वर्षांची आहे परंपरा Video

