Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपती मंदिराचा असाही विश्वविक्रम, वर्षभरात सर्वाधिक भाविक..., Video

Last Updated:

Dagdusheth Ganpati: श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम झाला आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक भाविकांनी भेट दिली आहे.

+
Dagdusheth

Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपती मंदिराचा असाही विश्वविक्रम, वर्षभरात सर्वाधिक भाविक..., Video

पुणे : जगप्रसिद्ध असलेलं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने आपल्या नावावर एक नवीन विक्रम नोंदवला आहे. या मंदिरात वर्षभरात सर्वाधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर ठरले आहे. या विक्रमाची नोंद घेत विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सतर्फे मंदिराला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती मंदिराचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी लोकल 18 ला दिली आहे.
महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं की, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभर अनेक भक्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात. भाविकांच्या या मोठ्या उपस्थितीमुळे दगडूशेठ गणपती मंदिराने एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. वर्षभरात सर्वाधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर म्हणून या मंदिराची नोंद झाली आहे. विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे चेअरमन मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल आणि 184 जागतिक विक्रमांची नोंद असलेले डॉ. दीपक हरके यांच्या उपस्थितीत या गौरवाचे प्रमाणपत्र मंदिराला प्रदान करण्यात आले.
advertisement
पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. यंदा या सतत वाढणाऱ्या भक्तसंख्येची अधिकृत नोंद घेण्यात आली असून, संपूर्ण वर्षभर सर्वाधिक 2 कोटींहून अधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर म्हणून दगडूशेठ गणपती मंदिराला विश्वविक्रमाचा सन्मान मिळाला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपती मंदिराचा असाही विश्वविक्रम, वर्षभरात सर्वाधिक भाविक..., Video
Next Article
advertisement
Local Body Election Vote Couting: हायकोर्टाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलली, निवडणूक आयोगाकडून समोर आली मोठी अपडेट
हायकोर्टाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलली, निवडणूक आयोगाकडून समोर आली मोठी अपडेट
  • हायकोर्टाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलली, निवडणूक आयोगाकडून समोर आली मोठी अपडेट

  • हायकोर्टाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलली, निवडणूक आयोगाकडून समोर आली मोठी अपडेट

  • हायकोर्टाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलली, निवडणूक आयोगाकडून समोर आली मोठी अपडेट

View All
advertisement