Shravan Month 2025: श्रावणात यंदा करता येणार नाही छ.संभाजीनगरच्या भद्रा मारुतीचा अभिषेक, 'हे' आहे कारण
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Shravan Month 2025: भाविक 4 वाजता होणाऱ्या अभिषेकाचे साक्षीदार होऊ शकतात. मात्र यंदा भद्रा मारुती संस्थान समितीने काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात, यावर्षीच्या श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवार आल्याने भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (25 जुलै) रोजी रात्रीच हजारो भाविक खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात दर्शनासाठी पायी निघणार आहेत. पहाटे 4 वाजता होणाऱ्या अभिषेकाचे साक्षीदार होऊ शकतात. मात्र यंदा भद्रा मारुती संस्थान समितीने काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
यंदा तसेच पहिल्यांदा भाविकांना गाभाऱ्यात बसून अभिषेक करता येणार नसल्याचे भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठू बारगळ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. उद्याच्या शनिवारपासून सोमवारपर्यंत, भाविकांना घृष्णेश्वराचाही अभिषेक करता येणार नाही, हा एक मोठा बदल देखील करण्यात आला.
advertisement
घृष्णेश्वराला श्रावणातील पहिला अभिषेक रविवारी रात्री 12 वाजता होणार आहे. यानंतर नैमित्तिक पारंपरिक अभिषेक मंदिर विश्वस्त करतील. मात्र, सर्वांना दर्शन घडावे म्हणून शनिवार, रविवार आणि सोमवारी अभिषेक करता येणार नाही. याव्यतिरिक्त मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी भाविकांना गाभाऱ्यात अभिषेक करता येणार असल्याची माहिती घृष्णेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष योगेश टोपरे यांनी सांगितले.
advertisement
श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात दर्शनानिमित्त भाविकांची अलोट गर्दी होते. यामुळे वाहतूक कोंडी होते. हे मार्ग राहणार बंद नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट (मध्यम आणि जड वाहनांसाठी) दौलताबाद टी पॉइंट ते दौलताबाद घाट गेट मार्ग (सर्व प्रकारच्या वाहनांसाठी) छत्रपती संभाजीनगरकडून नाशिक-धुळे जाणारी मध्यम आणि जड वाहने भगवान महावीर चौक, नगर नाका, एएस क्लब, करोडीमार्गे नवीन धुळे-सोलापूर हायवेने जांभाळा, कसाबखेडा फाटा, वेरूळमार्गे जातील. नाशिक -धुळ्याकडून शहरात येणारी मध्यम आणि जड वाहने वेरूळ, कसाबखेडा फाटा, एएस क्लब मार्गाने जातील.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
July 25, 2025 9:30 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Shravan Month 2025: श्रावणात यंदा करता येणार नाही छ.संभाजीनगरच्या भद्रा मारुतीचा अभिषेक, 'हे' आहे कारण