5 हजार वर्षांपूर्वीच्या मंदिरात महाशिवरात्रीला भक्तांची अफाट गर्दी, 1 किलोमीटरपासून दर्शनासाठी रांगा, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अमरावतीमधील श्री क्षेत्र कोंडेश्वर येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे. महाशिवरात्रीला 50 वर्ष पूर्ण झाल्याने भक्तांची असंख्य गर्दी बघायला मिळाली.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : अमरावती जिल्ह्यांत अनेक पुरातन शिव मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिराच्या आख्यायिका तर अतिशय रोमांचक आहेत. सर्वात प्रसिद्ध असलेलं सालबर्डी, धामंत्री, गव्हणकुंड आणि श्री क्षेत्र कोंडेश्वर हे आहेत. महाशिवरात्रीला या मंदिरात अफाट गर्दी बघायला मिळते. कोंडेश्र्वर या तीर्थक्षेत्राला 5 हजार वर्ष झालीत असे तेथील नागरिक सांगतात. त्याचबरोबर जीर्णोद्धाराला 50 वर्ष पूर्ण झाली असल्याने यावर्षी भक्तांची गर्दी दरवर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचं देखील बघायला मिळालं.
advertisement
श्री क्षेत्र कोंडेश्र्वर बाबत माहिती घेण्यासाठी लोकल 18 ने संस्थानचे कोषाध्यक्ष रामकृष्ण लांडोरे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, श्री क्षेत्र कोंडेश्र्वर हे पाच हजार वर्ष जुने आहे. अतिशय प्राचीन असे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराला 50 वर्ष झालीत. 50 वर्षांपासून दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी शिवभक्त येतात. पण, या वर्षी गर्दी जास्त असल्याचं दिसून येत आहे. जवळपास मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत तर बाहेरून जवळपास 1 किलोमीटर अंतरावरून रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत. गाभाऱ्यातून मंदिरात जाण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागत आहे. या शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविक दूरदूरून आलेले आहेत.
advertisement
मंदिराची आख्यायिका काय?
पाच हजार वर्षापूर्वी या मंदिरात असलेली पिंड ही काशीला स्थित असलेल्या कौंडीण्य ऋषीच्या हस्ते स्थापन करण्यात आली होती. विदर्भ राजा हा ब्रह्मावर्ताचा मुळनिवाशी होता. तो शिव भक्त होता त्यामुळे त्याने काशी वरून कौंडीण्य ऋषिला बोलावून त्यांच्या हस्ते ही शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली होती. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला कोंडेश्वर असे नाव देण्यात आले. ही पिंड स्थापन केली तेव्हा मंदिराचा गाभारा अतिशय छोटासा होता. राजा रामदेवराय यादव यांच्या काळात त्यांचे पंतप्रधान हेमाजी पंत यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे पुराणामध्ये नमूद आहे आणि वेदांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. त्यांनीच हे मंदिर हेमाडपंथी बांधल्याचा इतिहास आहे. त्याचबरोबर हजारो वर्षांपूर्वी ऋषिमुनीचे वास्तव्य देखील यापरिसरात होते, असे कोषाध्यक्ष सांगतात.
advertisement
महाशिवरात्रीला 50 वर्ष पूर्ण
50 वर्षाआधी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. तेव्हापासून याठिकाणी महाशिवरात्रीला मोठा उत्साह असतो. यावर्षी महाशिवरात्री उत्सवाला 50 वर्ष पूर्ण झाल्याने अमरावतीपासून आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांची गर्दी येथे बघायला मिळत आहे. कितीतरी दुरून मंदिरात दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
February 26, 2025 6:03 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
5 हजार वर्षांपूर्वीच्या मंदिरात महाशिवरात्रीला भक्तांची अफाट गर्दी, 1 किलोमीटरपासून दर्शनासाठी रांगा, Video