माझा जीव घुटमळतोय..., भक्ताच्या स्वप्नात आली देवी, आता नवरात्रीत मोठा उत्सव
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नवरात्री उत्सव काळात जालना येथील दुर्गादेवी मंदिरात मोठी गर्दी असते. या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते.
जालना, 11 ऑक्टोबर: नवरात्री उत्सवाच्या काळात शक्ती देवतांची पूजा केली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावांनी शक्ती देवता आहेत. जालना शहरातील दुर्गादेवी मंदिराला मोठं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी नवरात्री उत्सवाच्या काळात या ठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. नवसाला पावणारी देवी अशी भक्तांची मान्यता आहे. त्यामुळे जालना जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्यातून भक्त या ठिकाणी येत असतात.
नवसाला पावणारी देवी
जालना शहरातील जे इ एस महाविद्यालयात भरणारी दुर्गादेवीची यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे. भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून दुर्गादेवीची सर्व दूर ख्याती आहे. देवीला नवस बोलल्यानंतर तो हमखास पूर्ण होतो अशी भक्तांची मान्यता आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर भक्त देवीची खणा नारळाने ओटी भरतात. नवरात्र उत्सवातील नऊ दिवस इथे भक्तांची मोठी गर्दी असते.
advertisement
मंदिराविषयी आख्यायिका
दुर्गा देवीचे हे मंदिर जवळपास दीडशे वर्षे जुने आहे. दुर्गा देवीचे हे अतिशय पौराणिक मंदिर आहे. या देवीच्या मंदिराविषयी अशी आख्यायिका प्रचलित आहे की, शहरातील एक भक्त नानू रामजी श्रीमाळी यांच्या स्वप्नामध्ये दुर्गादेवी आली आणि मी इथे असून माझा जीव घुटमळत आहे, असं सांगितलं. त्यानंतर त्या भक्ताने देवीने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी खोदकाम केले. तेव्हा त्यांना देवीची मूर्ती आढळली. त्याच ठिकाणी त्यांनी मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली, असं मंदिराचे पुजारी अंबाशंकर श्रीमाळी यांनी सांगितलं.
advertisement
नवरात्रीत मोठा उत्सव
इथे देवीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर अश्विन महिन्यांमध्ये नऊ दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने यात्रा उत्सव साजरा केला जातो. घटस्थापनेच्या दिवशी देवीचा अभिषेक आणि शृंगार होतो. नऊ दिवस देवीचे वेगवेगळे शृंगार होतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ आरती होते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्त मंडळींच्या इच्छा आणि आकांक्षा देवीच्या आशीर्वादाने पूर्ण होतात. इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर भक्त देवीसाठी साडी, चोळी, ओटी, खण नारळ आदी साहित्य आणून देवीला अर्पण करतात. नऊ दिवस इथे आलेल्या भक्तांच्या सोयीसाठी यात्रेमध्ये वेगवेगळ्या वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनाचे साहित्य उपलब्ध झालेले असते. नवरात्र उत्सवातील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू असतात, असं मंदिराचे पुजारी अंबाशंकर श्रीमाळी यांनी सांगितलं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
October 11, 2023 4:16 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
माझा जीव घुटमळतोय..., भक्ताच्या स्वप्नात आली देवी, आता नवरात्रीत मोठा उत्सव

