स्वयंभू शिवलिंग असलेलं पेशवेपूर्वकालीन मंदिर, 600 वर्ष जुन्या हरीहरेश्वर मंदिरचा इतिहास माहितीये का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील शनिवार पेठ इथे असलेलं 500 ते 600 वर्ष जुनं असं हे पेशवेपूर्वकालीन मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरात अनेक पेशवेकालीन वास्तू तसेच मंदिर आहेत. त्यापैकीच एक हरीहरेश्वर मंदिर आहे. पुण्यातील शनिवार पेठ इथे असलेलं 500 ते 600 वर्ष जुनं असं हे पेशवेपूर्वकालीन मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. पूर्वी ज्यांना कोकणात हरिहरेश्वराच्या दर्शनाला जाणे शक्य व्हायचे नाही, ती लोक इथे या मंदिरात दर्शनाला येतं. या मंदिराचा इतिहास काय आहे याबद्दलचं आपल्याला हरीहरेश्वर मंदिराचे पुजारी दत्तात्रय वाघमारे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
काय आहे मंदिराचा इतिहास?
पुण्यातील शनिवार पेठ इथे 500 ते 600 वर्ष जुनं असलेलं हरिहरेश्वर मंदिर आहे. हरिहरेश्वर पेशव्यांचे कुलदैवत आहे. कोकणात श्रीवर्धनजवळ ते आहे. त्याचप्रमाणे हे पुण्यातील मंदिर आहे. ज्यांना तिकडे जाणे शक्य नाही ते इथे दर्शनासाठी येतात असतात. हे शिवलिंग स्वयंभू असल्याच ही सांगितलं जातं, असं दत्तात्रय वाघमारे सांगतात.
advertisement
गेली तिसरी पिढी आहे आमची आम्ही या मंदिराची सेवा करत आहोत. हे मंदिर पेशवेपूर्वकालीन आहे. पूर्वी या ठिकाणी जंगल होते आणि नदी काठी हे मंदिर होतं. एक गुराखी आपली गुर घेऊन रोज इथे चरायला घेऊन यायचा. त्यातीलच एक गाई एका झाडाखाली पान्हा सोडायची. त्यानंतर त्या गुराखी ने तेथे खादून पाहिलं तर शिवलिंग मिळाले. त्यामुळे हे स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराचा जीर्णोद्धार हा अहिल्याबाई होळकर यांनी 1768 साली केला आहे. कुठल्या ही युद्धला जाण्यापूर्वी पेशवे तांबडे जोगेश्वरी आणि हरीहरेश्वरच्या दर्शनाला येतं असतं.
advertisement
श्रीवर्धन कोकण या ठिकाणी जस हरिहरेश्वर मंदिर हे समुद्रकाठी आहे. त्याच प्रमाणे हे मंदिर नदी काठी आहे. हे जागृत देवस्थान आहे. महाशिवरात्रीला मोठा उत्सव देखील इथे भरवला जातो. त्यावेळी कीर्तन भजनाचे कार्यक्रम होतात, अशी माहिती मंदिराचे पुजारी दत्तात्रय वाघमारे यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 24, 2024 1:03 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
स्वयंभू शिवलिंग असलेलं पेशवेपूर्वकालीन मंदिर, 600 वर्ष जुन्या हरीहरेश्वर मंदिरचा इतिहास माहितीये का?