छत्रपती शाहू महाराज यांच्या श्वानाची समाधी पाहिली का? खंड्यानं केली होती मोठी कामगिरी, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज थोरले यांचे प्राणीप्रेम सर्वांना ज्ञात आहे. खंड्या श्वानाच्या निधनानंतर त्यांनी त्याची समाधी बांधली.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: आजपर्यंत आपण अनेक युगपुरुष, महात्मा, साधू संत यांची समाधीस्थळे पाहिली असतील. मात्र तुम्ही कधी कुत्र्याची समाधी पाहिली आहे का ? कुत्र्याची समाधी म्हटलं की अनेकांना आश्चर्य वाटेल. पण मराठा साम्राज्य भारतभर नेणाऱ्या छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांनी एका कुत्र्याची समाधी बांधली. साताऱ्यातील संगम माहुली येथे त्यांनी बांधलेल्या 'खंड्या' नावाच्या श्वानाची समाधी आजही इतिहासाची साक्ष देतेय. याबाबत इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांनी माहिती दिलीय.
advertisement
छत्रपती शाहू महाराजांचे प्राणी प्रेम
स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज थोरले यांचे प्राणीप्रेम सर्वांना ज्ञात आहे. त्यांनी पशु पक्ष्यांसाठी विशेष तरतुदी केल्याचे दाखले इतिहासात आहेत. छत्रपती शाहूंच्या श्वान आणि हत्ती प्रेमाबाबत काही कथाही सातारा परिसरात सांगितल्या जातात. 'खंड्या' नावाचा श्वान नेहमी त्यांच्यासोबत असायचा. या श्वानाने एकदा शिकारीला गेल्यावर शाहू महाराजांना वाचवल्याचेही सांगितले जाते.
advertisement
खंड्याला विशेष मान
छत्रपती शाहू महाराज एकदा शिकारीला गेले होते. तेव्हा एक वाघ त्यांच्यावर झडप घालण्याच्या तयारीत होता. तेव्हा खंड्या श्वानाच्या भुंकण्याने अनर्थ टळला. खंड्याच्या प्रामाणिक सेवेबद्दल शाहू महाराजांनी त्याला दरबारात बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. शाही श्वान म्हणून मान सन्मान दिला. तसेच त्याला पालखीचा मान दिल्याचेही इतिहास अभ्यासक सांगतात.
advertisement
खंड्याच्या निधनानंतर बांधली समाधी
खंड्या श्वानाच्या निधनानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी संगम माहुली येथे त्याच्यावर अग्निसंस्कार केले. त्यानंतर तिथे लाल दगडात त्याची समाधी बांधली. एका चौथऱ्यावर श्वानाची दगडी मूर्ती याठिकाणी बसवण्यात आलीय. 350 वर्षांपासून ही समाधी इतिहासाचा दाखला देत आहे. संगम माहुलीतील श्वानाची समाधी श्वानाच्या स्वामीनिष्ठेचं प्रतिक असल्याचंही सांगितलं जातं.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
May 12, 2024 10:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
छत्रपती शाहू महाराज यांच्या श्वानाची समाधी पाहिली का? खंड्यानं केली होती मोठी कामगिरी, Video