पुणेकरांची नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
सरत्या वर्षाला निरोप देत आज नवीन वर्षाची सुरुवात होत असून, नवीन संकल्प, आशा घेत नागरिक हे देवदर्शनाला जात असतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : सरत्या वर्षाला निरोप देत आज नवीन वर्षाची सुरुवात होत असून, नवीन संकल्प, आशा घेत नागरिक हे देवदर्शनाला जात असतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. नववर्षानिमित्त मंदिराला देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
advertisement
फक्त पुणे नव्हे तर बाहेरील जिल्ह्यातील नागरिक देखील दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. त्यामुळे मंदिर परिसर हा भक्तिमय झालेला पाहिला मिळत आहे. मंदिर परिसरात होत असलेली गर्दी पाहता वाहनांना देखील बंदी घालण्यात आली. जवळपास एक ते दीड किलोमीटर पर्यंत रांग लागलेली पाहिला मिळत आहे.
advertisement
'प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो आणि नवीन वर्षाची सुरुवात ही दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनानी करतो. सर्व जगाला सुख समृद्धी, यश, आरोग्य मिळो अशी देवाकडे प्रार्थना जी आहे ती केली आहे. आम्ही अक्कलकोटवरून इथे दर्शनासाठी आलो आहोत. हे सगळं वातावरण बघता छान वाटतं आहे', असं भाविकाने सांगितले.
advertisement
'दर्शनाला खूप गर्दी आहे. एवढी गर्दी होईल अशी अपेक्षा नव्हती. ढोलताशाचां गजर आणि भक्तिमय वातावरणात नवीन वर्षाचं स्वागत हे केलं जात आहे. यामुळे मनात छान भावना आहेत', अश्या भावनाही काही भाविकांनी व्यक्त केल्या आहेत.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 01, 2025 12:34 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
पुणेकरांची नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी