Famous Temple: वर्षभर बंद राहणारं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध मंदिर आजचाच दिवस खुलं, दर्शनाची संधी सोडू नका!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Famous Temple: छत्रपती संभाजीनगरमधील वर्षभर बंद राहणारं प्रसिद्ध मंदिर आज दर्शनासाठी खुलं राहणार आहे. भाविकांना दर्शनाची संधी पुन्हा वर्षभरानंतरच मिळेल.
छत्रपती संभाजीनगर : भक्ती आणि आध्यात्मिकता जोपासणाऱ्या खुल्लोड येथील कार्तिक पौर्णिमेनिमित्त खोलेश्वर महादेव देवस्थानातील कार्तिक स्वामींचे मंदिर आज, गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता भक्तांसाठी खुले केले आहे. वर्षभर बंद राहणारे हे पवित्र मंदिर केवळ या एका दिवशीच दर्शनासाठी उघडले जाते, त्यामुळे परिसरात भक्तांचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत आहे.
खुल्लोड हे गाव गोळेगाव-अंभई मार्गावर पश्चिम दिशेला सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. हे मंदिर वर्षभर बंद असतं. परंतु, आज कार्तिक स्वामींचं मंदिर सकाळी साडेपाचपासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे. या काळात हजारो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान, या विशेष प्रसंगी खोलेश्वर देवस्थान समितीने भक्तांना सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. भक्तांसाठी गावात महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे, मंदिर समिती आणि ग्रामस्थ एकत्र येऊन त्याची तयारी करत आहेत. गावातील प्रत्येक घर या उत्सवात सहभागी झाले आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 06, 2025 9:47 AM IST
मराठी बातम्या/Temples/
Famous Temple: वर्षभर बंद राहणारं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध मंदिर आजचाच दिवस खुलं, दर्शनाची संधी सोडू नका!


