Vastu Tips for Money: घरात पैशासोबत या वस्तू चुकूनही ठेवू नये! अनेकप्रकारे धनहानी वाढत जाते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips for Money: ज्योतिषशास्त्र सांगते की, जर एखादी व्यक्ती आपल्या पैशांच्या तिजोरीजवळ, पाकिटामध्ये किंवा पैशाच्याजवळ काही चुकीच्या वस्तू ठेवते, तर त्याला काही परिस्थितींमध्ये पैशाची कमतरता किंवा गरिबीचा सामना करावा लागू शकतो.
मुंबई: एखाद्या व्यक्तीची संपत्ती अचानक कमी होऊ लागली असेल तर समजून घ्यावे की, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. आपण अनेक दिवसांपासून या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर आता वेगळा विचार करायला लागेल, त्याची कारणे आणि उपाय जाणून घेऊ.
ज्योतिषी पंडित रमाकांत मिश्रा यांच्या मते, जर आपल्याला अचानक आर्थिक तंगी किंवा पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर त्याचे कारण आपल्याकडून झालेल्या काही चुका असू शकतात. होय, ज्योतिषशास्त्र सांगते की, जर एखादी व्यक्ती आपल्या पैशांच्या तिजोरीजवळ, पाकिटामध्ये किंवा पैशाच्याजवळ काही चुकीच्या वस्तू ठेवते, तर त्याला काही परिस्थितींमध्ये पैशाची कमतरता किंवा गरिबीचा सामना करावा लागू शकतो. आपण अशी चूक करत असाल तर आजच ती सुधारा. या उपायांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
या गोष्टी पैशांसोबत ठेवू नयेत -
पैशांसोबत तुम्ही कोणी तुम्हाला दिलेल्या वस्तू, दागिने, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मेकअपच्या वस्तू यासारख्या गोष्टी पर्समध्ये ठेवल्या तर या गोष्टी लवकरात लवकर घरी काढून ठेवा. कारण त्यांचा तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. या सर्व गोष्टी पैशाच्या कपाटात ठेवल्यानंही माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर आपल्यावर रुष्ट होतात, असेही मानले जाते.
advertisement
बेकायदेशीरपणे मिळवलेली संपत्ती -
जर तुम्ही काही चुकीच्या मार्गाने पैसा कमावला असेल तर तो तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशात ठेवू नका. कारण असे केल्याने हळूहळू गरिबी येऊ शकते. अनैतिकरित्या कमावलेला पैसा माणसाचे सुख आणि समृद्धी हिरावून घेतो, असे शास्त्रात सांगितले आहे.
advertisement
फसवणुकीतून कमावलेला पैसा -
वास्तुशास्त्रानुसार चोरी, दरोडा किंवा फसवणूक करून कमावलेला पैसा कधीही घरात राहत नाही आणि त्यामुळे घरात अस्थिरता येते. अशा पैशाचा माणसाला वाईट काळात काहीही उपयोग होत नाही आणि आयुष्यात तो टिकू शकत नाही.
तुटलेला आरसा -
ज्योतिषांच्या मते, काही लोकांना पैशाच्या तिजोरीत आरसा लावण्याची सवय असते. परंतु, पैशाच्या तिजोरीला शक्यतो आरसा नसावा. असल्यास आरसा तुटलेला किंवा तडा गेलेला नसावा. तिजोरी दक्षिण दिशेला असेल तेव्हा लाभ देईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2025 7:53 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips for Money: घरात पैशासोबत या वस्तू चुकूनही ठेवू नये! अनेकप्रकारे धनहानी वाढत जाते