advertisement

Garud Puran: मृत्यू येण्यापूर्वी व्यक्तीला सर्वात पहिलं काय दिसतं? गरुड पुराणात सांगितलेत संकेत

Last Updated:

Garud Puran: मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीला कोणते संकेत मिळतात, ते जाणून घेऊ या. ज्याचा जन्म झाला आहे, त्याचा मृत्यू अटळ असतो. मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास सुरूच राहतो.

News18
News18
मुंबई : जन्म-मृत्यूचं चक्र कायम सुरू राहतं. मृत्यू झाला तरी आत्मा अमर असतो, असं हिंदू धर्मात सांगितलं जातं. मृत्यू हे गूढ आहे. मृत्यू येण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला त्याचे काही संकेत मिळत असतात. गरुड पुराणात याबाबतची माहिती दिली आहे. मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीला कोणते संकेत मिळतात, ते जाणून घेऊ या.
ज्याचा जन्म झाला आहे, त्याचा मृत्यू अटळ असतो. मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास सुरूच राहतो. वेगवेगळ्या जन्मात केलेल्या कर्माच्या आधारे आत्मा स्वर्ग किंवा नरकात जातो, असं मानलं जातं. जन्म-मृत्यूचं रहस्य जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीला त्याचे संकेत मिळू लागतात. गरुड पुराणात याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.
हिंदू धर्मानुसार, संबंधित व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक झालेला असो अथवा अकाली झालेला असो, त्याची प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच सुरू झालेली असते. जर संबंधित व्यक्तीला हे संकेत समजले आणि त्याने चांगलं कर्म, तसंच देवाची आराधना केली तर अकाली मृत्यू टळू शकतो; पण मृत्यू होणार असेल तर त्याची वेळ जवळ येताच मिळणारे संकेत तीव्र होतात.
advertisement
एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी मृत्यूची चाहूल लागते. जर ती त्याला समजली तर तो ती ओळखू शकतो. पुराणानुसार, मृत्यूची चाहूल सर्वप्रथम नाभिचक्रावर जाणवते. मृत्यू येण्यापूर्वी नाभीचक्र तुटण्यास सुरुवात होते. जसजसं चक्र तुटतं तसतसं मृत्यू जवळ येण्याची इतर लक्षणं जाणवू लागतात.
मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीच्या शरीराचा विचित्र वास येऊ लागतो. हा वास मृतदेहाच्या वासासारखा असतो. ज्या व्यक्तीला जीवघेणा आजार झाला आहे, त्यांच्याबाबतीत हा संकेत दिसतो. याचा अर्थ त्यांचं शरीर आतून काही प्रमाणात मृत झालेले असते. मृत्यूच्या आधी काही दिवस संबंधित व्यक्तीला त्याची सावली दिसत नाही. याचा अर्थ त्याची सावली त्याच्यापासून वेगळी दिसू लागते. त्या सावलीत डोकं दिसत नाही.
advertisement
मृत्यू होण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला त्याचा चेहरा आरसा, तेल किंवा पाण्यात दिसणं बंद होतं. त्याची पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता संपुष्टात येऊ लागते. त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरतो.
मृत्यूच्या काही वेळ आधी संबंधित व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला यमदूत दिसू लागतात. तो त्यांना पाहून घाबरू लागतो. त्याला त्याच्या शेजारी नातेवाईक उभे असल्याचंदेखील दिसत नाही. मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीच्या तळहातावरच्या रेषा अस्पष्ट होतात. त्या अशा पद्धतीने पुसट होतात की त्या सहजपणे दिसतदेखील नाहीत.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Garud Puran: मृत्यू येण्यापूर्वी व्यक्तीला सर्वात पहिलं काय दिसतं? गरुड पुराणात सांगितलेत संकेत
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement