advertisement

Astro Tips: अशा 5 संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका; शुभ-मंगल काळाची चाहूल तेथून लागते

Last Updated:

Astro Tips Marathi: दुःखामागून सुख आणि सुखामागून दु:ख येतंच, म्हणजेच वाईट दिवसांमागून चांगल्या दिवसांची सुरूवात होतेच. याच शुभ दिवसांची चाहूल आपल्यासोबत घडणाऱ्या काही खास घटना देत असतात, असे मानले जाते.

News18
News18
मुंबई : सुख-दुःख या मानवी जीवनात निरंतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. दुःखामागून सुख आणि सुखामागून दु:ख येतंच, म्हणजेच वाईट दिवसांमागून चांगल्या दिवसांची सुरूवात होतेच. याच शुभ दिवसांची चाहूल आपल्यासोबत घडणाऱ्या काही खास घटना देत असतात, असे मानले जाते. आपल्याला केवळ त्या समजायला हव्या इतकंच. आज आपण ज्योतिशास्त्रानुसार निसर्ग आपल्याला चांगल्या दिवसांचे नेमके काय संकेत देतो, हे जाणून घेणार आहोत.
1. स्वप्नात काळा साप दिसणं : जर स्वप्नात सतत काळा साप दिसला, तर समजून जायचं की आता आपल्या वाटचं दुःख लवकरच संपून आयुष्यात प्रचंड आनंद येणार आहे.
2. सकाळी शंखाचा आवाज ऐकू येणं : एखाद्या दिवशी झोपेतून जाग येताच शंखाचा आवाज ऐकू आला किंवा स्वप्नात शंखनाद झाला, तर तुमच्यावर देवी-देवतांची कृपा झाली हे समजून जायचं. कारण हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे अडचणी लवकरच संपणार हे निश्चित होतं.
advertisement
3. तळहाताला खाज येणं : पुरुषांच्या उजव्या आणि महिलांच्या डाव्या तळहातावर खाज आली की समजून जायचं धनलाभ योग निर्माण झाला आहे. आता आपल्याला अचानक पैसे मिळू शकतात.
4. स्वप्नात मंत्र ऐकू येणं : स्वप्नात पूजेचे मंत्रोच्चार ऐकू येणं ही चांगल्या दिवसांची नांदी असते. त्यामुळे आता आपलं आयुष्य आनंदाने बहरणार आहे, हे समजून जायचं.
advertisement
5. घरातलं वातावरण शांत असणं : घरात सतत वाद होणं अशुभ मानलं जातं. परंतु जर घरातलं वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न असेल तर येणारे दिवसही आपल्यासाठी शुभ असतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Astro Tips: अशा 5 संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका; शुभ-मंगल काळाची चाहूल तेथून लागते
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement