प्राण्यांची चरबी असलेला तिरुपतीचा लाडू खाऊन शरीर अपवित्र; आता काय करायचं? शंकराचार्यांनी सांगितलं
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
आंध्र प्रदेश : प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये जनावरांची चरबी असल्याचा दावा जेव्हापासून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे, तेव्हापासून हे प्रकरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. मंदिरात तयार होणारा प्रसादम लाडू देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आणि त्यानंतर तो भाविकांना प्रसाद म्हणून वाटप केला जातो. मागच्या सरकारच्या कार्यकाळात या लाडूत जनावरांची चरबी मिक्स केली जायची असं मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दावा करताना सांगितलं.
या बातमीमुळे देशभरातील लाखो-करोडो भाविकांच्या भावना दुखावल्या आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलो असताना आम्ही प्रसाद म्हणून गायीची चरबी, माशाचं तेल मिक्स केलेला लाडू खाल्ला, यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये. आपला धर्म भ्रष्ट झाला आहे. शरीर अपवित्र झाले आहे, असं लोकांना वाटत आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितला शरीर पवित्र करण्याचा उपाय
जर तुम्ही या मंदिरातील लाडू खाल्ला असेल आणि तुम्हाला आपल्याकडून नकळत चूक झालीय, असं वाटत असेल. तसेच तुमचं शरीर अपवित्र झाल्याने तुम्ही चिंतेत असाल तर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी सांगितल्यानुसार तुम्ही तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त करू शकता. त्यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी प्रायश्चित्त करण्यासाठी उपाय सांगितला आहे. त्यांनी त्यांच्या 1008.guru या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी चरबीमिश्रित प्रसाद खाल्लेल्या लोकांसाठी प्रायश्चित्त करण्याकरिता उपाय सांगितला आहे.
advertisement
पंचगव्यपान करून करा प्रायश्चित्त
शंकराचार्यांनी सांगितलं की, `आम्ही मंदिरातील लाडू खाल्ला आहे. आता काय करायचं, आम्ही अपवित्र झालो आहोत. स्वतःला पवित्र करण्यासाठी काय करायचं असे प्रश्न देशभरातील लोक विचारत आहेत.` यावर शंकराचार्यांनी एक उपाय सांगितला आहे. ॐ यत्व्य गति गतं पापं | तिष्ट्ता मामवे || प्राश नाम पंचगव्याच| दहत्वग्नी रिवेंर्दम || त्यांनी पंचगव्य प्राशन करण्याबाबत भाष्य केलं आहे. `आपल्याकडे पूर्वीपासून शास्त्रात अशी सोय केली आहे की चुकून एखाद्या दोषानं शरीरात प्रवेश केला आणि तो अस्थी (रस,रक्त, मांस, मज्जा, मेद, अस्थी) अर्थात हाडांपर्यंत पोहोचला तर पंचगव्य हे फार प्रभावी ठरतं. ज्या प्रमाणे आगीत इंधन टाकलं तर आग इंधनाला संपुष्टात आणते, त्याप्रमाणे पंचगव्य पान केल्यास शरीरात दडलेलं पाप नष्ट होतं,असं त्यांनी व्हिडिओत सांगितलं आहे. ``त्यामुळे पहिलं पंचगव्यपान करा. त्यामुळे तुम्ही नकळत केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करू शकाल आणि स्वतःला पवित्र बनवू शकाल. तुमची सर्व पापं नष्ट होतील. गोमाता तुमची सर्व पापं नष्ट करेल,` असं शंकराचार्यांनी सांगितलं आहे.
advertisement
पंचगव्य म्हणजे काय?
गायीपासून मिळणाऱ्या पाच वस्तूंचे मिश्रण म्हणजे पंचगव्य होय. यात दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्राचा समावेश असतो. हिंदू धर्मात पंचगव्याला विशेष महत्त्व आहे. पंचगव्याशिवाय कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, असं मानलं जातं.
Location :
Delhi
First Published :
September 23, 2024 5:13 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
प्राण्यांची चरबी असलेला तिरुपतीचा लाडू खाऊन शरीर अपवित्र; आता काय करायचं? शंकराचार्यांनी सांगितलं