अक्षय्य तृतीयेला कोणत्या मुहूर्तावर खरेदी करावं सोनं? काशीच्या ज्योतिषांनी सांगितली वेळ

Last Updated:

या वर्षी अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी होणार असून, वैदिक पंचांगानुसार या दिवशी रवी योग, शोभन योग आणि सिद्धी योगाचा त्रिवेणी संगम होणार आहे. या दिवशी सुवर्ण, फ्लॅट, गाडी यांसारख्या... 

Akshaya Tritiya 2025
Akshaya Tritiya 2025
Akshaya Tritiya 2025 : पंचांगानुसार 30 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. दरवर्षी हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येतो. या तिथीला शास्त्रात खूप महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी सोने खरेदी करण्याचीही मान्यता आहे. असं म्हणतात की, या दिवशी केलेले पुण्य कधीही वाया जात नाही. चला तर मग जाणून घेऊया, या वेळी अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे.
काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितलं की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्थिर लग्नात सोने, जमीन, फ्लॅट किंवा वाहन खरेदी करणं खूप शुभ असतं. ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ लग्न ही स्थिर लग्न मानली जातात. हिंदू पंचांगानुसार, 30 एप्रिल रोजी सोने खरेदीसाठी तीन शुभ मुहूर्त सर्वोत्तम आहेत.
हे तीन मुहूर्त कधी आहेत?
या दिवशी पहिला मुहूर्त सकाळी 6:18 ते 8:20 पर्यंत आहे. या वेळेत वृषभ लग्न आहे. दुसरा आणि सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 12:46 ते 3 वाजेपर्यंत आहे. या वेळेत सिंह लग्नासोबत शोभन योग आहे. तिसरा आणि शेवटचा मुहूर्त सायंकाळी 7 ते रात्री 9:46 पर्यंत असेल.
advertisement
वैदिक पंचांगानुसार, या वेळी अक्षय्य तृतीयेचा महान सण 30 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगासोबत शोभन योगाचाही शुभ संयोग आहे. यासोबतच या दिवशी रवि योग देखील आहे, जो रात्रभर असणार आहे.
विना मुहूर्ताचा विवाह दिवस
अशी धार्मिक मान्यता आहे की, अक्षय्य तृतीयेला केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय्य फळ देणारे ठरते. त्यामुळे या दिवशी विवाह, मुंडन, अन्नप्राशन इत्यादी सर्व शुभ कार्य विना मुहूर्ताचे केले जातात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
अक्षय्य तृतीयेला कोणत्या मुहूर्तावर खरेदी करावं सोनं? काशीच्या ज्योतिषांनी सांगितली वेळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement