तब्बल 40 दिवस चालणारी विदर्भातील यात्रा, हंडी मटणासाठी आहे प्रसिद्ध, दूरवरून येतात लोक

Last Updated:

विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणजेच बहिरम यात्रा. ही यात्रा 20 डिसेंबरपासून सुरू झालेली आहे. याठिकाणी दूरदूरन भाविक बहिरम बाबांच्या दर्शनासाठी येतात. याठिकाणी हंडी मटण खूप प्रसिद्ध आहे. 

+
News18

News18

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणजेच बहिरम यात्रा. ही यात्रा 20 डिसेंबरपासून सुरू झालेली आहे. याठिकाणी दूरदूरन भाविक बहिरम बाबांच्या दर्शनासाठी येतात. रविवारच्या दिवशी बहिरम हे क्षेत्र भाविकांनी गजबजून जातं. दरवर्षी हिवाळ्यामध्ये अमरावतीमधील बहिरम येथे भरणारी ही यात्रा सलग 40 दिवस चालते. या यात्रेतील विशेष म्हणजे हंडी मटण. बहिरम येथील हंडी मटण चाखण्यासाठी अनेक लोकं या ठिकाणी येतात. परराज्यातून अनेक व्यावसायिक या ठिकाणी येऊन आपली राहोटी बसवतात.
advertisement
बहिरम यात्रेविषयी लोकल 18 ने तेथील सुनील घोडकी चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, बहिरम बाबा हे सुपारीपासून बनलेले आहेत. टेकडीवर छोटीशी सुपारी ठेवलेली होती. त्याठिकाणी बहिरम बाबाचे छोटेसे मंदिर होते. गवळी लोकांची येथे वस्ती होती. गवळी लोकांचे श्रद्धा स्थान असल्याने ते लोकं बहिरम बाबाची पूजा करत होते. बहिरम बाबा हे शंकराचे रूप आहे. गवळी लोकांकडे जेव्हा जेव्हा गाय किंवा म्हशीचे पाहिले तूप किंवा लोणी निघायचे तेव्हा सर्वात आधी ते बहिरम बाबाच्या पूजेसाठी आणत होते. त्यानंतरच त्याची विक्री करत होते. त्यामुळे ही प्रथा सुरू झाली.
advertisement
आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा लोणी किंवा तूप बहिरम बाबाला चढविण्यासाठी आणत होते. काही जण आताही आणतात. तूप आणि शेंदूर बहिरम बाबाला चढवला जातो. त्यामुळे छोटीशी सुपारी आणि त्याला तूप लावल्याने आज बहिरम बाबा आपल्याला भव्य स्वरूपात बघायला मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
हंडी मटण आणि रोडगेसाठी प्रसिद्ध 
पूर्वी या ठिकाणी बहिरम बाबाच्या पहिल्या पायरीपासून ते वरपर्यंत बोकड कापल्या जात होते. म्हणजेच बळी प्रथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत होती. त्यामुळे अतिशय गलिच्छता या ठिकाणी पसरली होती. ती प्रथा वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांनी बंद केली. त्यानंतर तेथील अनेक लोकांनी व्यवसाय म्हणून हंडी मटण ही संकल्पना उदयास आणली. तेव्हापासून या ठिकाणी हंडी मटण बनवल्या जाते. हंडी मटण आणि रोडगे ही मेजवानी या ठिकाणी अनेक लोकांना आकर्षित करते. हंडी ही मातीची असल्याने येथील भाजीची चव ही काही वेगळीच असते, असे अनेक लोकं म्हणतात.
advertisement
मातीच्या भांड्यातील जेवण आरोग्यासाठी सुद्धा चांगले असते. या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळायला लागला. मातीच्या हंडीमध्ये या ठिकाणी मटण बंनवून दिल्या जाते. बहिरम क्षेत्रातील जागा प्रत्येक जागा ही व्यापारी लोकं भाडे तत्वावर घेतात. त्याठिकाणी 40 दिवसासाठी आपली राहोटी बसवतात. राहोटीमध्ये हंडी मटण म्हणून जेवणाची व्यवस्था असते. त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था सुद्धा असते.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/अध्यात्म/
तब्बल 40 दिवस चालणारी विदर्भातील यात्रा, हंडी मटणासाठी आहे प्रसिद्ध, दूरवरून येतात लोक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement