पोटॅटो ट्विस्टरपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या मॅगी, स्वस्तात जोगेश्वरी फुड कट्ट्यावर घ्या आस्वाद!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
जोगेश्वरीच्या अजिंक्य धामणस्कर आणि अतुल धामणस्कर या दोन भावांनी मिळून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या जवळच जोगेश्वरी फुड कट्टा नावाचे एक फुड स्टॉल सुरू केले आहे. या स्टॉलचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी किंमतीत सर्वांना परवडेल असे दर त्यांनी ठेवले आहेत.
निकता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : सध्याचा घडीला तरुण हे व्यवसायाकडे वळत आहेत. जोगेश्वरीच्या अजिंक्य धामणस्कर आणि अतुल धामणस्कर या दोन भावांनी मिळून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या जवळच जोगेश्वरी फुड कट्टा नावाचे एक फुड स्टॉल सुरू केले आहे. मराठी माणसाने व्यवसायात उतरले पाहिजे, हाच विचार डोक्यात घेऊन हे दोघे भाऊ स्वतःची खाजगी कंपनीची नोकरी सांभाळून नोकरी व्यतिरिक्त हा फुड स्टॉल चालवत आहेत. जोगेश्वरी परिसरात अनेक वेगवेगळे फूड स्टॉल दिसतील. मात्र या स्टॉलचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी किंमतीत सर्वांना परवडेल असे दर त्यांनी ठेवले आहेत.
advertisement
पोटॅटो ट्विस्टर, वेफर पाव, वेगवेगळ्या प्रकारच्या मॅगी आणि वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव इथे तुम्हाला चाखायला मिळतील. इतर ठिकाणी आपल्याला पोटॅटो ट्विस्टर शंभर रुपयांच्या पुढे विकत मिळतात मात्र जोगेश्वरी फुड कट्टा यांची खासियत हीच आहे की फक्त 70 रुपयांमध्ये पोटॅटो ट्विस्टर विकत मिळेल. जोगेश्वरी रेल्वे स्थानकापासून एक मिनिटाच्या अंतरावर असलेले जोगेश्वरी फुड कट्टा हे शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन तरुणी-तरुणांच्या खिशाला परवडेल अशा प्रकारचे आहे.
advertisement
लोकल 18 सोबत बोलताना अजिंक्य धामणस्कर म्हणाले की, आम्ही आमचा फॅमिली बिजनेस म्हणून हा छोटा व्यवसाय चालू केला आहे. अनेक जण आपण फक्त गोष्टी बोलताना पाहतो, मात्र आम्ही कोणतीही गोष्ट फक्त सवांदा पुरती मर्यादित न ठेवता त्याचे प्रत्यक्षात रूपांतर करून छोटा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवलं. या संपूर्ण व्यवसायाला माझा भाऊ अतुल धामणस्कर तसेच माझे वडील सुहास धामणस्कर या दोघांचा देखील खूप चांगला प्रतिसाद आहे. सुरुवातीला नोकरी करुन व्यवसाय करने कठीण आहे असे वाटतं होते मात्र आता सर्व संभाळून आणि वेळेचं योग्य व्यवस्थापन करुन आम्ही आमचा फुड कट्टा चालवतो आहे. तसेच प्रत्येकाने व्यवसायात उतरल्याशिवाय व्यवसायामधील त्रुटी कळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने एकदा व्यवसाय करूनच पाहिले पाहिजे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 13, 2025 1:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पोटॅटो ट्विस्टरपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या मॅगी, स्वस्तात जोगेश्वरी फुड कट्ट्यावर घ्या आस्वाद!