MI vs KKR : टीम संकटात, अजिंक्य रहाणे अचानक मैदान सोडलं; पुढची मॅच खेळणार का नाही? आली मोठी अपडेट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने दुखापतीमुळे मैदान सोडलं होते.त्यामुळे रहाणेची दुखापत किती मोठी आहे? हे जाणून घेऊयात.
MI vs KKR : मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने कोलकत्ताने दिलेले 221 धावांच भलं मोठं लक्ष्य 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 6 विकेटने जिंकला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सने 14 वर्षाचा वनवास संपवला आहे.तसेच मुंबईच्या या विजयात 81 धावा करणारा रायन रिकल्टन आणि 78 धावा करणारा रोहित शर्मा मॅचविनर ठरला होता. या सामन्यात मुंबईने पहिल्या बॉलरपासून कोलकत्ता नाईट रायडर्सला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही.विशेष म्हणजे या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने दुखापतीमुळे मैदान सोडलं होते.त्यामुळे रहाणेची दुखापत किती मोठी आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर मुंबई इंडियन्सने 5 ओव्हरमध्ये 64 धावा ठोकल्या असताना अजिंक्य रहाणेच्या पायात क्रम्प आला होता.त्याच्यानंतर फिजिओला मैदानात बोलवलं होतं.पण त्याचाही फारसा फायदा झाला नाही, आणि शेवटी अजिंक्य रहाणे मैदान सोडून बाहेर गेला होता.त्यामुळे त्याची दुखापत गंभीर होती, असे वाटले होते.त्यामुळे कोलकत्ता चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.
दरम्यान आता अजिंक्य रहाणेने मॅचनंतर आपल्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे. आता बरं वाटतं आहे. पण आधी पायात खुप क्रॅम्प येत होत्या. पण मी लवकरच बरा होईन,असे अजिंक्य रहाणे दुखापतीवर बोलला आहे.
advertisement
220-225 ही एक चांगली धावसंख्या होती. गोलंदाजीचा ताफा नवखा होता, पण ही मुले शिकतील. मुंबई इंडियन्सने चांगली फलंदाजी केली,असे देखील अजिंक्य रहाणे म्हणाला आहे. तसेच आपल्या फलंदाजीबद्दल बोलताना रहाणे म्हणाले की, मी अजून तरुण आहे, छान वाटत आहे. मी ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आशा आहे की ग्रीन लवकरच गोलंदाजी सुरू करेल. आम्ही खूप चांगली फलंदाजी केली, गोलंदाजीमध्ये संतुलन साधणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच ग्रीन गोलंदाजी का करू शकत नाही?यावर रहाणे म्हणाला हा प्रश्न तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारायला हवा.त्यामुळे त्याच्या या विधानाने सर्वांच्या भूवय्या उंचावल्या होत्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 11:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs KKR : टीम संकटात, अजिंक्य रहाणे अचानक मैदान सोडलं; पुढची मॅच खेळणार का नाही? आली मोठी अपडेट








