advertisement

भारतीय खेळाडूचं दु:ख काही संपेना! वडिलांसह मोठ्या भावाला गमावलं, बहिणीची कॅन्सरशी झुंज,आता IPLच्या आधी मोठं संकट

Last Updated:

खेळाडूने आधी आपल्या वडील आणि भावाला गमावले होते.त्यानंतर बहीण कॅन्सरशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत त्याने मैदान सोडलं नाही, तो खेळत राहिला, आता आयपीएलमध्ये झळकेल असे वाटत होते. पण त्याच्यावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

kolkatta knight riders 2026
kolkatta knight riders 2026
Akashdeep Ruled out From IPL 2026: आयपीएल 2026 चा हंगाम सूरू व्हायला आता जवळपास एक आठवड्याचा कालावधी उरला आहे.दरम्यान याआधी अनेक खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात आता आणखीण एक खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाला आहे. विशेष म्हणजे या खेळाडूने आधी आपल्या वडील आणि भावाला गमावले होते.त्यानंतर बहीण कॅन्सरशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत त्याने मैदान सोडलं नाही, तो खेळत राहिला, आता आयपीएलमध्ये झळकेल असे वाटत होते. पण त्याच्यावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे आणि तो स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा खेळाडू नेमको कोण आहे, जो इतक्या दु:खातून जातोय, तरी मैदान सोडत नाही आहे.तर हा खेळाडू दुसरा तिसरा कूणी नसून टीम इंडियाचा स्टार बॉलर आकाशदिप आहे. आकाशदिपने आयुष्यात प्रचंड दु:ख सहन केलं आहे. 2015 हे वर्ष आकाशदिपसाठी खूपच कठीण होतं.कारण त्यावर्षी सहा महिन्याच्या कालावधीच त्याने आपले वडील आणि मोठ्या भावाला गमावलं होतं. आकाशदिपचे वडील रामजी सिंह यांना पॅरालीसचा अटॅक आला होता. तर त्याच्या मोठ्या भावाला सर्दी ताप होता, पण योग्य उपचार न मिळाल्याने त्याने जीव गमावला होता.अशाप्रकारे आकाशदिपने आपल्या आयुष्यातले दोन आधारस्तंभ गमावले होते.
advertisement
वडील भावाच्या निधनानंतर त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यामुळे त्याला 3 वर्ष क्रिकेट सोडावं लागलं होतं.या दरम्यान कुटुंबासाठी त्याने मजूरीच (वाळू भरण्याच) काम केलं.यातून त्याने क्रिकेटसाठी कसाबसा वेळ काढत प्रॅक्टीस सूरूच ठेवली. त्यानंतर 2024 मध्ये आकाशदिपने इंग्लंड विरूद्ध टेस्ट सामन्यात डेब्यू केला होता. या स्पर्धेत त्याने एजबस्टनमध्ये 10 विकेटस काढले होती. ही त्याची टीम इंडियासाठी सर्वोत्तम कामगिरी केली होती. या दरम्यान आकाशदिपच्या बहिणीला कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली होती.त्यामुळे वडील भावाला गमावून त्याचं दु:ख काय संपलं होतं.
advertisement
आता आयपीएल 2026च्या हंगामात त्याला खेळायची संधी होती. कोलकत्ता नाईट रायडर्सने त्याला 1 कोटी रूपयांच्या किंमतीत संघात घेतलं होतं. त्यामुळे तो खेळेल अशी अपेक्षा होती. पण आता आकाशदिप आयबीएसच्या बाहेर झाला आहे. कोलकत्ताने 18 मार्च 2026पासून प्रॅक्टीसला सूरूवात केली आहे. पण अद्याप तो कॅम्पमध्ये दाखलच झाला नव्हता.कारण तो बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे. पण त्याला नेमकी काय दुखापत झाली आहे, याची माहिती मिळु शकली नाही आहे. पण तो आयपीएलमधून बाहेर झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
आकाशदीपच्या करिअरला नेहमीच दुखापतीच ग्रहण लागलं होतं.2022 मध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केल्यापासून त्याने फक्त
14 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 10 विकेट घेतले. मागच्या आयपीएलमध्ये तो लखनऊ सुपर जाएटसचा भाग होता, लखनऊने त्यांना 8 करोडच्या किमतीत ताफ्यात घेतलं होतं. पण एक सीरीजनंतर त्याला रिलीज करण्यात आलं होतं.
कोलकत्तासाठी सर्वांत मोठा झटका
कोलकत्तासाठी हा सर्वात मोठा झटका आहे.कारण बांग्लादेशमद्ये हिंदुवर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर बीसीसीआयने कोलकत्ताच्या मुस्तफिजूरची हकालपट्टी केली होती.त्यात हर्षित राणा आधीच दुखापतीमुळे आधीच बाहेर होता. श्रीलंकेच्या मथिशा पथिराणाला देखील दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप सावरू शकला नाही आहे. त्यामुळे तो देखील बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर होता. त्यानंतर आता आकाशदिप बाहेर झाला आहे.त्यामुळे चार बॉलर बाहेर झाल्याने कोलकत्ता संकटात सापडली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारतीय खेळाडूचं दु:ख काही संपेना! वडिलांसह मोठ्या भावाला गमावलं, बहिणीची कॅन्सरशी झुंज,आता IPLच्या आधी मोठं संकट
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement